Kitchen Jugaad Video : गॅस सिलेंडरसोबत ठेवा बांगड्या, जबरदस्त फायदा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kitchen Tips In Marathi : एका महिलेने गॅस सिलेंडरचा जबरदस्त असा जुगाड दाखवला आहे. तो म्हणजे गॅस सिलेंडरखाली बांगड्या ठेवण्याचा. यामुळे भरपूर पैसे वाचतील असा दावा या महिलेने केला आहे.
नवी दिल्ली : गॅस सिलेंडर लावताना आणि लावल्यानंतरही काही काळजी घ्यायची असते हे आपणा सर्वांना माहिती आहे. पण आणखी एक काम जे गॅस सिलेंडरबाबतीत करायला हवं. या किचन जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
एका महिलेने गॅस सिलेंडरचा जबरदस्त असा जुगाड दाखवला आहे. तो म्हणजे गॅस सिलेंडरखाली बांगड्या ठेवण्याचा. यामुळे भरपूर पैसे वाचतील असा दावा या महिलेने केला आहे. आता हा जुगाड नेमका आहे काय, ते पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
advertisement
नेमकं करायच काय?
महिलेने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मेटलच्या बांगड्या घ्यायच्या आहेत. महिलेने 3 मोठ्या मेटल बांगड्या घेतल्या आहेत. त्या तिने सिलेंडरच्या खाली त्याच्या कडेला ठेवल्या आहेत. म्हणजे या बांगड्यांवर तिने सिलेंडर ठेवला आहे.
याचा फायदा काय?
तुम्ही पाहिलं असेल आपण सिलेंडर जिथं ठेवतो तिथं खाली डाग पडतात. सिलेंडरच्या खाली असलेला गंज जमिनीला लागतो. हा डाग सहजासहजी जात नाही.
advertisement
तसं सिलेंडर ठेवण्यासाठी ट्रॉली मिळतात. पण सगळ्यांकडेच ती असेल असं नाही. किंबहुना या जुगाडाने तुम्ही त्या ट्रॉलीसाठी लागणारे पैसे वाचवू शकता.
advertisement
पुणेरी तडका युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
Delhi
First Published :
June 01, 2025 3:15 PM IST