TRENDING:

Kitchen Jugaad Video : चपातीच्या पिठाला तेलाऐवजी टूथपेस्ट लावा, चमत्कारिक फायदा

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : चपातीच्या पिठाला टूथपेस्ट लावण्याचा असा फायदा की तुम्ही विचारही केला नसाल. विचित्र पण फायद्याचा अशा जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : चपातीचं पीठ म्हणजे कणिक मळताना आपण पाणी, तेल याचा वापर करतो. कणिक मळून झालं की चपाती बनवतात त्यावर तेल किंवा पिठाचा वापर करतो. पण तुम्ही कधी कणकेला टूथपेस्ट लावून पाहिली आहे का? वाचतानाच विचित्र वाटेल पण याचा मोठा फायदा आहे.
News18
News18
advertisement

कणकेला टूथपेस्ट लावून वापरल्याने काय होतं हे एका गृहिणीनं दाखवलं आहे. या जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत महिलेने दाखवल्यानुसार तिने चपातीच्या मळलेल्या पिठातील थोडं पीठ घेतलं आहे. त्यावर तिने टुथपेस्ट लावली. त्यानंतर तिनं ते पीठ बोटाभोवती लावलं आहे. टुथपेस्टचा भाग बोटावर ठेवला आहे.

Kitchen Jugaad Video : गॅस सिलेंडरला बटाटा लावताच कमाल झाली, आश्चर्यकारक परिणाम

advertisement

आता याचा फायदा काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर महिलेने व्हिडीओत सांगितल्यानुसार बऱ्याच महिलांना बोटांना रॅशेस होता, जळजळ होण्याची समस्या असते. हे टुथपेस्ट लावलेलं पीठ काही वेळ लावून ठेवल्याने ही समस्या दूर होते असा दावा तिने केला आहे. तसंच यासाठी फक्त पांढरी टुथपेस्टच वापरण्याचा सल्ला तिने दिला आहे.

advertisement

Avika rawat foods युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Kitchen Jugaad : चपाती करताना त्यावर लावा नारळाची शेंडी; का ते VIDEO पाहा

(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. तसंच यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी न्यूज18मराठी जबाबदार नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : चपातीच्या पिठाला तेलाऐवजी टूथपेस्ट लावा, चमत्कारिक फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल