advertisement

Kitchen Jugaad : चपाती करताना त्यावर लावा नारळाची शेंडी; का ते VIDEO पाहा

Last Updated:

Kitchen Tips in Marathi : कधी चपाती करताना नारळ वापरून पाहिला आहे का? अशाच जबरदस्त किचन जुगाड चा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होतो आहे.

News18
News18
नवी दिल्ली : चपाती करताना नारळाचा वापर, वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आतापर्यंत तुम्ही चपाती बरोबर नारळाची चटणी खाल्ली असेल. पण कधी चपाती करताना नारळ वापरून पाहिला आहे का? अशाच जबरदस्त किचन जुगाड चा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होतो आहे.
गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी याचे व्हिडीओ करून ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. अशाच एका गृहिणीने पोस्ट केला आहे व्हिडीओ. ज्यात तिने नारळाच्या एका भागाचा वापर चपातीवर करून दाखवला आहे. हा भाग म्हणजे नारळाची शेंडी.
advertisement
सामान्यपणे आपण नारळ फोडला ही खोबरं असलेला भाग ठेवतो, त्याची शेंडी फेकून देतो. पण महिलेने व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार नारळाचा ही शेंडी खूप कामाची आहे. चपाती करताना तुम्हाला याचा मोठा उपयोग होईल. आता तो कसा ते पाहूयात
advertisement
आता तुम्हाला करायचा काय तर नारळाची शेंडी काढून घ्या. त्याची शेंडी एक असते, म्हणजे ते दोरे एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, ते सुटे करून घ्या. आता ते पुन्हा एकत्र करून एका दोरीने घट्ट बांधून घ्या. आता हा तुमचा घरगुती ब्रश तयार झाला. याचा वापर तुम्ही डोसा बनवताना तव्यावर आणि चपाती करताना चपातीवर तेल लावण्यासाठी करू शकता. शिवाय तुम्ही याने चपाती तव्यावर फिरवू शकता, दाब देऊन चपाती फुलवूही शकता.
advertisement
simply marathi युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad : चपाती करताना त्यावर लावा नारळाची शेंडी; का ते VIDEO पाहा
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement