हिरवी मिरची जी कापताना हाताला लागली तरी हात जळजळतात. बराच वेळ ही जळजळ जात नाही. तसे हात आपण डोळ्यांना किंवा चेहऱ्याला कुठेही लावले तरी तिथंही जळजळू लागतं. आता अशी मिरची कपड्यांना लावायची, किंबहुना त्यानेच कपडे धुवायचे म्हणजे थोडं रिस्कीच आहे की नाही. पण या अजब जुगाडाचा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या मनातील ती भीतीसुद्धा दूर होईल.
advertisement
Kitchen Jugaad Video : गॅस संपण्याचं टेन्शनच नाही, सिलेंडरवर फक्त ओला कपडा ठेवा
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता गृहिणीने एक ड्रेस घेतला आहे. त्याच्या थोड्याशा भागावर तिने सुरुवातीला व्हिनेगर लावलं. व्हाईट किंवा अॅपल कोणतंही व्हिनेगर चालेलं असं तिनं सांगितलं. यानंतर तिने हिरव्या मिरच्या घेतल्या. या मिरच्या किसणीवर किसून तिने त्या व्हिनेगर लावलेल्या भागावर लावल्या. गृहिणीने यासाठी ताज्या मिरच्याच घेण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्यात घटक चांगल्या प्रमाणात असतात. यानंतर गृहिणीने मिरची-व्हिनेगर लावलेला भाग पाण्याने स्वच्छ केला.
Kitchen Jugaad Video : टोमॅटो वापरा पण टुथपेस्ट लावून, विचित्र आहे पण खूप फायद्याचं
आता याचा फायदा काय तर तुम्ही व्हिडीओ पाहिला तर जो ड्रेस महिलेने घेतला आहे. त्यावर एक छोटासा डाग आहे. ज्यावर महिलेने व्हिनेगर-हिरवी मिरची लावून पाण्याने धुतलं. अगदी मिनिटात हा फार न घासता, मेहनत न घेता गायब झाला आहे. अनेकदा आपल्या कपड्यांना डाग लागतात. हे डाग सहजासहजी जात नाहीत. विशेषतः पेनाच्या शाईचे डाग तर बिलकुल जात नाहीत. अशावेळी त्या डागावर मिरची-व्हिनेगर लावल्याने ते डाग गायब होतात, असा दावा या गृहिणीने केला आहे.
युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी याची हमी देत नाही.)
