Kitchen Jugaad Video : गॅस संपण्याचं टेन्शनच नाही, सिलेंडरवर फक्त ओला कपडा ठेवा

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : अचानक सिलेंडर संपला की मग तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही. एका गृहिणीने दाखवलेली ही ट्रिक. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

News18
News18
नवी दिल्ली : सकाळी घाईघाईत टिफिन करताना किंवा दुपारी स्वयंपाक करताना अचानक सिलेंडर संपले की वांदे होतात. तुमच्यासोबतही असं कधी ना कधी झालं असेल. पण आता गॅस अचानक संपण्याची झंझटच नाही. सिलेंडरवर ओला कपडा ठेवल्यास कमाल होईल. एका गृहिणीने हा जबरदस्त  किचन जुगाड  दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
तसं गृहिणींना गॅस सिलेंडर कधी लावला, कधी संपणार याची कल्पना असते. पण काही वेळा गॅस जास्त वापरला जातो. ते पटकन लक्षात येत नाही आणि अचानक गॅस संपतो. अचानक सिलेंडर संपला की मग तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही. एका गृहिणीने दाखवलेली ही ट्रिक. एक ओला कापड सिलेंडरवर लावताच मोठी कमाल झाली. यामुळे सिलेंडर अचानक संपण्याचं टेन्शन नाही.
advertisement
आता तुम्हाला करायचं काय आहे तर एक कपडा घेऊन तो ओला करायचा आहे. या ओल्या कपड्याने संपूर्ण सिलेंडर पुसून घ्यायचा आहे. व्हिडिओ मध्ये गृहिणीने सांगितल्यानुसार जिथपर्यंत सिलेंडरमधील गॅस संपला तिथपर्यंत सिलेंडरवरील पाणी लगेच सुकेल. म्हणजे सिलेंडरचा तो भाग कोरडा होईल. तर जिथपर्यंत गॅस आहे तो भाग ओला राहील. यामुळे सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे ते समजेल. 
advertisement
तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
advertisement
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमतचा याच्याशी संबंध नाही. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : गॅस संपण्याचं टेन्शनच नाही, सिलेंडरवर फक्त ओला कपडा ठेवा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement