TRENDING:

Video : तो झाडावरुन खाली उतरु लागला आणि... सिंहिणीच्या हल्ल्याचा तो व्हिडीओ अंगावर काटा आणेल

Last Updated:

हे हिंस्र प्राणी संग्रालयात शांत वाटत असले तरी देखील ते त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार वागतात आणि त्यांच्या क्षेत्राचे (Enclosure) उल्लंघन झाल्यास ते धोकादायक ठरू शकतात. असे अनेक प्रसंग जगभरात घडले आहेत, जिथे लोकांनी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा अति-उत्साहापायी स्वतःचा जीव गमावला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्राणीसंग्रहालये (Zoos) आणि अभयारण्ये (Sanctuaries) नेहमीच लोकांना वन्यजीवांच्या जवळून पाहाता येतात. इथे वाघ, सिंह सारखे हिंस्र प्राणी देखील पाहाता येतात. हे प्राणी पिंजऱ्यात असल्याने आपण सुरक्षित असतो, पण असं असलं तरी देखील वाघ, सिंहा सारख्या प्राण्याला जवळून पाहाताना हृदयाचा ठोका चुकतोच. हे हिंस्र प्राणी संग्रालयात शांत वाटत असले तरी देखील ते त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार वागतात आणि त्यांच्या क्षेत्राचे (Enclosure) उल्लंघन झाल्यास ते धोकादायक ठरू शकतात. असे अनेक प्रसंग जगभरात घडले आहेत, जिथे लोकांनी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा अति-उत्साहापायी स्वतःचा जीव गमावला आहे.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

प्राणीसंग्रहालये लोकांना वन्यजीवनाचे दर्शन घडवतात, पण येथे सुरक्षेचे नियम कठोरपणे पाळणे आवश्यक असते. कारण जंगली प्राणी त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार वागतात आणि त्यांच्या क्षेत्राचे उल्लंघन झाल्यास ते त्वरित प्रतिक्रिया देतात. ब्राझीलमध्ये अशीच एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे, जिथे एका तरुणाला त्याच्या स्वप्नाचा थरार जीवावर बेतला.

ब्राझीलमधील जोआओ पेसोआ (Joao Pessoa) शहरात असलेल्या पार्क झुबोटानिओ अरुदा कॅमरा (Parque Zoobotanio Arruda Camara) या प्राणीसंग्रहालयात 19 वर्षीय गर्सन डी मेलो माचाडो (Gerson de Melo Machado) नावाचा तरुण सिंहीणीच्या पिंजऱ्यात (Enclosure) शिरला आणि सिंहाच्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

advertisement

गर्सन डी मेलो माचाडो याचे स्वप्न होते की, त्याला प्राण्यांना सांभाळायचं होतं आणि सिंहांना वशमध्ये करायचे (Lion Tamer) होतं. मानसिक आरोग्याच्या समस्या (Schizophrenia) असलेल्या या तरुणाने रविवारी (Sunday) सिंहीणीच्या पिंजऱ्यात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रथम 20 फुटांचे उंच कुंपण ओलांडले आणि त्यानंतर पिंजऱ्यातील एका झाडावरून खाली उतरू लागला.

ही हृदयद्रावक घटना प्राणीसंग्रहालयातील भेटीसाठी आलेल्या लोकांनी हतबल होऊन पाहिली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गर्सन झाडावरून खाली उतरत असतानाच 'लिओना' नावाच्या सिंहीणीने त्याच्या दिशेने धाव घेतली आणि जसा तो झाडावरून खाली उतरला, सिंहीणीने लगेच त्याच्यावर झडप घातली.

advertisement

सिंहीणीने त्याला फरफटत भिंतीच्या मागे नेले. काही क्षणांसाठी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु सिंहीणीने पुन्हा त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. एका आणखी व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की सिंहीण त्याला खाण्याच्या प्रयत्नातच होती, पण तोपर्यंत झूमधील एका व्यक्तीने अग्निशामक यंत्र वापरुन आणि सिहिंणीला थोडं घाबरवून तिला लांब केलं.

advertisement

दुसऱ्या एका व्हिडीओत पाहू शकता की त्या तरुणाचं शव खाली पडलं आहे आणि सिंहीण लांब जाऊन बसली आहे, तिथे तिच्या तोंडाला आणि अंगाला रक्त लागलेलं दिसत आहे. हा प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, गर्सन माचाडो याला स्किझोफ्रेनिया (Schizophrenia) हा मानसिक आजार होता आणि बालपणी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तसेच त्याने तुरुंगातही काही काळ काढला होता. त्याचे सिंहांना वश करण्याचे स्वप्न इतके तीव्र होते की, एकदा त्याने आफ्रिकेकडे जाणाऱ्या एका विमानाचा लँडिंग गिअर (Landing Gear) मध्ये लपून जाण्याचाही प्रयत्न केला होता, पण वेळेवर तो आढळला होता त्यामुळे त्याला खाली उतरवण्यात आले होते.

प्राणीसंग्रहालय प्रशासनाने या दुर्दैवी घटनेला दुजोरा दिला आहे, परंतु सिंहीणीला 'युथेनाइज' (Euthanize - जीवे मारले) केले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. प्राणीसंग्रहालयाच्या निवेदनानुसार, "या घटनेनंतर सिंहीणीची तांत्रिक टीमने त्वरित तपासणी केली असून तिच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे, कारण तिला मोठ्या तणावातून (Stress) जावे लागले आहे."

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात चढ-उतार, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

"लिओना (सिंहीणी) पूर्णपणे निरोगी आहे आणि या घटनेच्या संदर्भाबाहेर तिच्यात कोणत्याही प्रकारची आक्रमक प्रवृत्ती दिसून येत नाही. तिला जीवे मारले जाणार नाही," असे सांगून त्यांनी अशा परिस्थितीत पाळल्या जाणाऱ्या नियमांची माहिती दिली. या घटनेत प्राण्याची कोणतीही चूक नसल्यामुळे, त्याला शिक्षा दिली जाणार नाही.

मराठी बातम्या/Viral/
Video : तो झाडावरुन खाली उतरु लागला आणि... सिंहिणीच्या हल्ल्याचा तो व्हिडीओ अंगावर काटा आणेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल