व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूला रस्त्यावर एक व्यक्ती झोपली आहे. इतक्या उजव्या बाजूने एक सिंह येतो. सिंह त्या व्यक्तीजवळ जातो. तेव्हाच आपल्याला धडकी भरते. सिंह आता या व्यक्तीची शिकार करतो की काय अशी भीती वाटते. मात्र घडतं उलटंच. असं काही की अनेकांचा या व्हिडीओवर विश्वास बसत नाही आहे.
सिंह त्या व्यक्तीजवळ जातो पण त्याची शिकार करत नाही. तर तिथून तो निघून जातो. आता सिंह असा का वागला, असा प्रश्न पडतोच. व्यक्तीचं नशीब चांगलं म्हणून सिंह इतक्या जवळ येऊनही ही व्यक्ती मृत्यूपासून बचावली आहे.
advertisement
OMG! कधी पाहिलाय का आकाशात उडणारा सिंह? सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय Video
व्हिडीओ नीट पाहिला तर तिथल्या दुकानांच्या बोर्डवर गुजरातीमध्ये लिहिलेलं दिसत आहे. यावरून हे दृश्य गुजरातमधील असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तर काहींनी याला एआय जनरेटेड व्हिडीओ म्हटलं आहे.
AI grok ने देखील हा व्हिडीओ पाहिला आणि तो एआय जनरेटेड नसल्याचं म्हटलं आहे. हे दृश्य खरं असल्याचा दावा AI grok ने केला आहे. AI grok ने सांगितलं की, गुजरातमध्ये झोपलेल्या माणसाजवळून सिंह चालत जातानाचा व्हिडिओ खरा वाटतो. सिंह कधीकधी गिर जंगलाजवळील शहरी भागात येतात आणि टाइमस्टॅम्पसारखे सुरक्षा कॅमेऱ्याचे तपशील त्याची सत्यता सिद्ध करतात.
Animal Facts : एक पक्षी जो जंगलाच्या राजाचा 'काळ', लाथ मारून घेतो सिंहाचा जीव
सिंहाचं शांत वर्तन असामान्य आहे आणि या विशिष्ट घटनेची पुष्टी करणारे कोणतेही अधिकृत अहवाल नाहीत, ज्यामुळे काही अनिश्चितता आहे. त्यामुळे हा व्हिडीओ खरा आहे की नाही माहिती नाही.