असे म्हणतात की, प्रेमाला वय नसतं. पण जेव्हा कोणी 45 वर्षांच्या वयाच्या अंतराने नातं निर्माण झालेलं असतं तेव्हा कुटुंबाला ते सहन करणे कठीण होऊन बसतं. असेच काहीसे एका जोडप्यासोबत घडले ज्यांची जोडी कोणालाही मान्य नाही. मात्र, त्यांना याचा कोणताही पश्चाताप नाही. ही कथा खूप विचित्र आहे. पण हे जोडपे दावा करते की, ते एकमेकांच्या प्रेमात आहेत.
advertisement
43 वर्षांचा मुलगा, 88 वर्षांची गर्लफ्रेंड
द सनच्या रिपोर्टनुसार, 43 वर्षीय एड्रियन नार्वाएझची गर्लफ्रेंड पाहून लोकांना वाटते की, तो त्याच्या आजीसोबत फिरत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एड्रियन 88 वर्षीय डेलिया लुकेझसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांची पहिली भेट तेव्हा झाली जेव्हा एड्रियन 16 वर्षांचा होता आणि डेलिया 61 वर्षांची होती. 1998 मध्ये एका प्रदर्शनादरम्यान त्यांची भेट झाली आणि त्यांच्यात बऱ्याच गोष्टी समान असल्यामुळे ते मित्र बनले. एड्रियनला शिक्षिका आणि हौशी चित्रकार डेलियाची सर्जनशीलता आवडली आणि काही वर्षांच्या मैत्रीनंतर ते रोमँटिक रिलेशनशिपमध्ये आले. एड्रियन म्हणतो की, त्याला नेहमीच जुन्या गोष्टी आवडत होत्या आणि त्याला असे वाटत होते की, त्याचा जन्म चुकीच्या वेळी झाला आहे.
सासूने सुनेला पाहिले, तर डोक्याला हात लावला
सुरुवातीला, जोडप्याने त्यांचे नाते गुप्त ठेवले आणि ते फक्त कधीतरी भेटत असत. मात्र, एक वर्षानंतर त्यांनी त्यांचे नाते सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला. एड्रियनच्या वडिलांनी डेलियाला पाहिले तेव्हा त्यांनी कसेतरी ते स्वीकारले. पण आई आपल्यापेक्षा मोठी सून पाहून सहन करू शकली नाही. ती म्हणाली की, तिला काही ऐकायचे आणि बघायचे नाही. तिने दोघांना वेगळे करण्याचाही प्रयत्न केला. पण ते इतके सोपे नव्हते. जोडपे म्हणतात की, ते एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांना कोणीही वेगळे करू शकत नाही.
हे ही वाचा : लोकांमध्ये झोपेसंबंधी 'हे' समज आहेत पूर्णपणे चुकीचे, विज्ञानाने सिद्ध केल्या अनेक धक्कादायक गोष्टी
हे ही वाचा : सापांसाठी ही वस्तू ठरते विष, चुकूनही पाजू नका, अन्यथा त्यांचा गुदमरून होतो मृत्यू
