यामध्ये एक IITN बाब आणि सुंदर साध्वी हर्षाचा समावेश आहे, पण नंतर हे समोर आलं की हर्षा ही साध्वी नसून तिने फक्त दीक्षा घेतली आहे. पण या दोन लोकांची सध्या जोरदार चर्चा आहे, लोकांना आता त्यांच्याबद्दल त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्याचं आहे. ज्यामुळे लोक गुगलवर हेच सगळं सर्च करत आहेत.
advertisement
पण या सगळ्यात कुंभमेळ्यातील आता आणखी एक तरुणी चर्चेत आली आहे. सावळा रंग, घारे आणि बोलके डोळे, सुंदर लांब केस आणि स्मित हास्य अशा आपल्या सौंदर्यामुळे या महिलेनं सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षीत केलं आहे.
खरंतर ही तरुणी कुंभमेल्यात रुद्राक्ष आणि त्याची माळा विकणारी आहे. पण तिच्या शांत स्वभाव आणि सुंदरतेमुळे ती देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सुंदर साध्वी नंतर आता ही सुंदर तरुणी कुंभमेळ्यातील चर्चेचा विषय आहे.
लोक या सुंदर तरुणीची मोनालिसाच्या सौंदर्याशी तुलना करत आहेत आणि तिच्या व्हायरल झालेल्या फोटो व्हिडीओवर जोरदार कमेंट्स करत आहेत.
या तरुणीचं नाव कळू शकलेलं नाही, पण ती मध्यप्रदेशातील इंदूरमधील असल्याची माहिती समोर आली आहे.