TRENDING:

'माझी 15 वर्ष मला परत हवी आहेत.....' बँकेची नोकरी करणारा तरुणाच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ

Last Updated:

असा प्रश्न उभा राहिलाय एका व्यक्तीच्या वक्तव्यानंतर जो बँकेत नोकरी करायचा आणि त्याला आता ही नोकरी नकोशी झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतातील बहुतांश तरुणांचं स्वप्न असतं सरकारी नोकरी मिळवणं. त्यात बहुतांश लोक हे बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहातात. कारण अशी नोकरी मिळाली की आयुष्य सुरक्षित, पगार नियमित आणि समाजात मान-सन्मान मिळतो, अशी धारणा आहे. अनेकजण यासाठी दिवस-रात्र अभ्यास करतात, अपयश आलं तरी हार मानत नाहीत. पण एकदा नोकरी मिळाल्यानंतर खरंच जीवन सुरक्षित होतं का? मानसिक शांती, आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्य हे सगळं मिळतं का?
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

असा प्रश्न उभा राहिलाय एका व्यक्तीच्या वक्तव्यानंतर जो बँकेत नोकरी करायचा आणि त्याला आता ही नोकरी नकोशी झाली आहे.

या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की “मला माझं आयुष्य परत हवं आहे.”

फायनान्शियल एक्सप्रेसनं दिलेल्या माहितीनुसार, एका सरकारी बँकेतील कर्मचाऱ्याने आपली नोकरी सोडली. कारण त्याच्या म्हणण्यानुसार, या नोकरीनं त्याला 15 वर्षात फक्त ताण, आजारपण आणि घुटमळणं दिलं.

advertisement

हा 39 वर्षांचा बँकर Reddit वरील r/IndianWorkplace फोरमवर लिहितो की, “मी माझ्या सरकारी बँक नोकरीत घुटमळतोय. लोकं ज्या नोकरीला सुरक्षित आणि प्रतिष्ठित मानतात, त्यात मला आता राहायचंच नाही.”

नोकरीचं स्वप्न की दु:स्वप्न?

बँकरनं राष्ट्रीय स्तरावरील कठीण स्पर्धा परीक्षा पास करून ही नोकरी मिळवली होती. सुरुवातीला ते स्वप्नपूर्तीसारखं वाटलं. पण कालांतराने टार्गेट्स, आठवड्याच्या शेवटीही काम आणि मालकांच्या अनावश्यक आदेशांनी आयुष्यच बदललं.

advertisement

त्याच्या म्हणण्यानुसार, रविवारीसुद्धा काम करून विमा पॉलिसी विकायला लावतात.

वरिष्ठांच्या अन्यायकारक अपेक्षा पूर्ण करायला भाग पडलं जातं.

आपल्या मताला किंवा आवाजाला किंमत नाही.

सोशल मीडियावरसुद्धा मत मांडता येत नाही.

नोकरीसोबत आजारही मिळतात

या ताणामुळे त्याला हाय बीपी, थायरॉईड आणि फॅटी लिव्हरसारखे आजार झाले. तो लिहितो “हो, ही नोकरी मला स्थिर पगार, घर, कार आणि समाजात मान देत होती. पण तिनं माझ्या आयुष्यातून शांती हिरावली आहे”

advertisement

शेवटी त्यानं कामावर जाणं थांबवलं. अर्थातच आता त्याचा पगार थांबेल, आर्थिक अडचणी येतील. पण तरीही तो म्हणतो, “मला माझं आयुष्य परत हवं आहे. आशा आहे की आता तरी ते मला मिळेल.”

वाचकांची प्रतिक्रिया

या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. कुणी लिहिलं

“आपण PSU नोकऱ्यांच्या टॉक्सिक नेचरबद्दल पुरेसं बोलत नाही.”

“माझी बहीण सरकारी बँकेत काम करते, तिची स्थितीही अशीच आहे. ती आपल्या मुलीसोबत वेळ घालवूही शकत नाही.”

advertisement

ही कथा ऐकल्यावर प्रश्न उभा राहतो. सरकारी नोकरी म्हणजे खरंच सुरक्षित आयुष्य की मानसिक आणि शारीरिक आरोग्य गमावण्याचं एक मोठं चक्र? तुम्हाला काय वाटतं? मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा.

मराठी बातम्या/Viral/
'माझी 15 वर्ष मला परत हवी आहेत.....' बँकेची नोकरी करणारा तरुणाच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल