खरंतर हा तरुण प्रेमात आकंठ बुडालेला आहे. तो पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणीच्या प्रेमात पडला. तिची एक झलक आणि स्माइल पाहण्यासाठी ही व्यक्ती दररोज त्या पेट्रोल पंपावर यायचा. तो सोबत आपल्या आजूबाजूचे लोक किंवा मित्रांना घेऊन यायचा. त्यांची गाडी आणून त्यामध्ये हा तरुण स्वत:च्या पैशाने पेट्रोल भरत असे.
एक हसू पाहण्यासाठी हा प्रेमवीर रोज वेगवेगळ्या वाहनांमध्ये पेट्रोल भरायला येतो. इतकंच नाही तर तो नेहमी तिलाच गाडी भरायला सांगतो, कारण तो फक्त तिच्याशीच संवाद साधायचा प्रयत्न करत असतो.
advertisement
या सगळ्या "मिशन पेट्रोल प्रेम"मध्ये त्याचे मित्रही साथ देतायत. एकजण ड्रायव्हर बनतो, दुसरा कॅमेरा घेऊन व्हिडीओ शूट करतो. त्याच्या या प्रेम कहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला आहे.
या ‘मिशन’चा क्लायमॅक्सही तितकाच फिल्मी. व्हिडीओच्या शेवटी त्या तरुणीने प्रेमवीराकडे पाहून गोड हसू दिलं… आणि सोशल मीडियावर कोणी तरी एकदम लिहिलंच की "भाभी ने हां कर दी." हा खूपच मनोरंजक असा व्हिडीओ आहे. जो त्याच्या या युनिक गोष्टीमुळे व्हायरल झाला आहे.