त्या व्यक्तीने त्याच्या नवीन घराचा रात्रीचा व्हिडिओ लोकांसोबत शेअर केला आहे. रात्र होताच त्याच्या घरात विचित्र घटना घडू लागतात हे त्याने लोकांना दाखवून दिले. त्याच्या घरात आपोआप इस्त्री सुरू होते. दिवे आणि पंखे आपोआप चालू होतात. यानंतर त्या व्यक्तीने सांगितले की, कदाचित याच कारणामुळे डीलरने त्याला 2 कोटी रुपयांचे घर फक्त 20 लाख रुपयांमध्ये दिले.
advertisement
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आपल्या घराच्या खोलीत घडणाऱ्या विचित्र घटना लोकांना दाखवल्या. त्याच्या घरातील इस्त्री आपोआप चालू झाली. खुर्च्या स्वतःच सरकू लागल्या. याशिवाय पंखे आणि दिवेही आपोआप चालू-बंद होऊ लागले. त्या व्यक्तीने दावा केला की त्याच्या घराला भुताने पछाडले होते. या कारणामुळे घरमालकाने हे घर त्याला स्वस्तात विकले.
हा व्हिडीओ शेअर होताच तो व्हायरल झाला. मात्र, अनेकांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे. हा बनावट असल्याचा लोकांनी दावा केला आहे. कारण अशा घटना खऱ्या आयुष्यात घडणं शक्य नाही.
