अमरोहा जिल्ह्यातील रहरा पोलीस स्टेशन हद्दीतील खुशहालपुर गावातील रहिवासी जसवीर सिंह यांच्या म्हशीने काल रात्री एका पिल्लाला जन्म दिला. म्हशीच्या पिल्लाचा जन्म होताच कुटुंबात जल्लोषाचं वातावरण होतं. रात्री म्हशीने जन्म दिला आणि कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. यानंतर जसवीरने आपल्या फोनवरून पोलिसांना फोन केला. त्याने 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांनाही आपल्या घरी बोलावले.
advertisement
रात्री घरी परतला पती; पत्नीच्या रूममधून येत होते विचित्र आवाज, दरवाजा उघडताच सरकली पायाखालची जमीन
मध्यरात्री पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांचे पथकही गावात पोहोचले. येथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी जसवीरच्या घरी दार ठोठावलं तेव्हा त्याने संपूर्ण हकीकत सांगितली. जसवीरने पोलिसांना सांगितलं माझी कोणतीही तक्रार नाही, त्याने पोलिसांना फक्त दूध पाजण्यासाठी बोलावलं होतं. हे संपूर्ण संभाषण फोनवर रेकॉर्ड करण्यात आलं. आता त्याचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये पोलीस शेतकऱ्याला ओरडताना दिसत आहेत. या कृत्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्याला खडसावलं. अशा गोष्टींवर पोलिसांचा वेळ वाया घालवू नका, असा सल्लाही पोलीस कर्मचाऱ्याने दिला. अशा मूर्खपणामुळे पोलिसांचा वेळ आणि संसाधने वाया जातात. शेतकऱ्यानेही पोलिसांचा हा सल्ला गांभीर्याने घेत पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचे सांगितले. यानंतरही हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोक त्यांच्या प्रतिक्रियाही देत आहेत.
