TRENDING:

Bike Stunt : आधी भरधाव वेगात गाडी पळवली, मग हवे लटकला; बाईक स्टंटचा धक्कादायक व्हिडीओ अंगावर आणेल शहारा

Last Updated:

सध्या सोशल मीडियावर असाच एक स्टंटबाज युवकाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : रस्त्यावर जाताना अनेकदा असे लोक नजरेस पडतात जे स्टंटबाजीला ‘कूल’ समजतात. हे लोक बाईकवर आपल्याला धोकादायक स्टंट करताना सहज दिसतील पण हे धोकादायक असतं. यामुळे अनेकदा लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागतात किंवा मग कधीकधी शारीरिक अपंगत्व येतं. यासंबंधीत अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील, पण असं असलं तरी देखील लोक याला घाबरत नाहीत किंवा थांबत नाहीत.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

सध्या सोशल मीडियावर असाच एक स्टंटबाज युवकाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती बाईकवर बसलेला आहे, पण तो सीटच्या अगदी मागच्या टोकाला बसतलेला आहे. त्याने हातात हँडलही पकडलेलं नाही. इतक्यावरच तो थांबत नाही. तो हळूहळू मागच्या कॅरियरजवळ जातो आणि तिथे जाऊन हातांच्या जोरावर हवेत शरीर उचलतो. बाईक वेगाने धावत असतानाच तो मागच्या टोकावर हवेत लटकत स्टंट करतो. त्याला जरा ही भीती वाटत नाही की जर समोर काही आलं, बॅलन्स बिघडलं, तर थेट अपघात होऊ शकतो.

advertisement

हा व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सवर @jindagikisikh45 नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. याशिवाय ‘एक्स’ (Twitter) वरही मोठ्या प्रमाणात तो रीपोस्ट होत आहे.

व्हिडिओवर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या

एका युजरने लिहिलं, “बघ, उडता-उडता वर जाऊ नकोस.” तर दुसऱ्याने कमेंट केली, “लवकरच पोलिस हेही विमान बनवतील.” तिसऱ्याने लिहिलं, “असं पाहता हा स्वतःच हेलिकॉप्टर बनेल.” आणखी एका युजरने गंभीरपणे सांगितलं, “असे लोक फक्त स्वतःच नाही तर इतरांच्याही जीवाला धोका निर्माण करतात.” हे खरं देखील आहे.

advertisement

स्टंटबाजी हा शौर्याचा खेळ नसून जीवाशी खेळ आहे. थोड्या थरारासाठी केलेली ही कसरत स्वतःसह रस्त्यावर चालणाऱ्या निरपराध लोकांनाही संकटात ढकलू शकते.

मराठी बातम्या/Viral/
Bike Stunt : आधी भरधाव वेगात गाडी पळवली, मग हवे लटकला; बाईक स्टंटचा धक्कादायक व्हिडीओ अंगावर आणेल शहारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल