अलीकडेच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit च्या r/Whatisthis ग्रुपवर, एका वापरकर्त्याने 3 फोटो पोस्ट केले आणि सांगितले की त्याने त्याच्या मैत्रिणीच्या खोलीच्या व्हेंटमधून हे विचित्र उपकरण पाहिले. त्याने विचारले- हा कॅमेरा आहे का, जर हो तर मग त्यासोबत येणाऱ्या बोर्डचा काय उपयोग? त्या माणसाला समजलं की तो कॅमेरा आहे, पण तो ते निश्चितपणे सांगू शकत नव्हता. या कारणास्तव त्याने लोकांकडून मत मागितलं.
advertisement
अनेकांनी त्याच्या पोस्टला उत्तर दिलं आणि ते काय आहे ते सांगितलं. सत्य जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. एका वापरकर्त्याने म्हटलं की तो वाय-फाय कॅमेरा होता आणि कोणीतरी त्याच्या मैत्रिणीवर लक्ष ठेवून होते. एकाने म्हटलं की ते कदाचित सेन्सॉर असेल. त्यापैकी एकाने विचारलं की ती कुठे राहते, जर ती भाड्याच्या घरात राहत असेल तर नक्कीच घरमालकाने काहीतरी घाणेरडं काम केलं असेल. एका व्यक्तीने सांगितलं की हा वाय-फाय कॅमेरा नाही तर एक शॉर्ट-रेंज कॅमेरा आहे. ज्यामध्ये सेन्सरदेखील आहे आणि त्याचा रिसीव्हर खूप जवळ असेल. एकाने सांगितलं की ते बाळाचे मॉनिटर असू शकतं.
एका कमेंटला उत्तर देताना, त्या माणसाने म्हटलं की त्याला वाटतं की त्याच्या प्रेयसीच्या एक्स बॉयफ्रेंडने तो कॅमेरा बसवला असावा. हे जाणून लोकांना आणखी आश्चर्य वाटलं. लोकांनी सांगितलं की ती महिला तिच्या घरी जाण्यापूर्वी कॅमेरा तिथं असण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, अनेकांनी सांगितलं की त्यांनी यापूर्वी कधीही इतका अनोळखी कॅमेरा पाहिला नव्हता.