एका मुलाने रेडिट या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर r/Weird वर एक ग्रुप आहे. सुमारे एक आठवड्यापूर्वी @Gazers22 या युझरने या ग्रुपवर एक फोटो पोस्ट केला आणि लोकांकडून मदत मागितली.
पँटवर अचानक दिसला हिरवा डाग
या फोटोत त्याने आपला पाय टाकला आहे. त्याने पँट घातली आहे आणि त्या पँटवर हिरव्या रंगाचा डाग दिसत आहे. गोलाकार आकारात हा डाग आहे. रात्री झोपताना त्याच्या पँटवर डाग नव्हता. पण सकाळी उठल्यानंतर अचानक त्याला त्याच्या पँटवर हा हिरवा डाग दिसला. त्यामुळे तो घाबरला. हे नेमकं काय ते त्यालाही समजेना म्हणून त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत मदत मागितली आहे.
advertisement
नवरा डॉक्टर पण त्याला बिकिनी घालायची हौस, बायकोची पोलिसात धाव, म्हणाली, रात्रभर ते...
मुलाने पोस्टमध्ये सांगितलं की, जेव्हा तो सकाळी उठला तेव्हा त्याला त्याच्या पँटवर हिरव्या रंगाचा हा विचित्र डाग दिसला. असं त्याच्या शरीरावर इतर कुठेही नव्हते, ते फक्त तिथंच होतं.
जर हा डाग लाल असता, तर ते रक्त असावं असं समजलं असतं, निळा किंवा काळा असता तर शाईचा डाग असावा, असा अंदाज बांधता आला असता. पण असा हिरवा डाग खूप विचित्र आहे. या कारणास्तव, त्या व्यक्तीने रेडिटवर फोटो पोस्ट केला आणि लोकांकडून सल्ला मागितला.
हा हिरवा डाग कसला?
हजारो युझर्सनी या मुलाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. हा हिरवा डाग कसला हे सांगितलं आहे. काहींनी तर अगदी भीतीदायक कारण दिलं आहे. एका युझरने विचारलं की तुमच्या बेडवर चार्जिंग केबल आहे का? एका युझरने म्हटलं की त्याला त्याच्या उशीवरही असाच हिरवा डाग दिसला. त्यानंतर माझा आयफोन केबल कापला गेला होता आणि त्यातून हिरवा पदार्थ गळल्याचं सांगितलं. एकाने विचारलं की त्याने कोणत्या हिरव्या रंगाचा खाद्यपदार्थ खाल्ला होता का? एकाने विचारलं, तुझ्याकडे हिरव्या शाईचा पेन आहे का? तर एकाने चक्क कुणी त्याला कार्बन मोनोक्साइडचं विष दिलं का असंही विचारलं. एकाने तर याचा संबंध थेट एलियन्सशी जोडला आहे.
OMG! 5000 वर्षे जुना मृतदेह, त्यातून अचानक येऊ लागला सुगंध, शास्त्रज्ञही हैराण, मोठा खुलासा
तुम्हाला काय वाटतं हा हिरवा डाग कसला असेल? तुमची यावरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.