advertisement

नवरा डॉक्टर पण त्याला बिकिनी घालायची हौस, बायकोची पोलिसात धाव, म्हणाली, रात्रभर ते...

Last Updated:

Doctor wear bikini : डॉक्टरच्या पत्नीने आपल्या पतीवर गंभीर आरोप केला आहे. डॉक्टरच्या पत्नीनेच त्याच्यावर हा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

News18
News18
लखनऊ : उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने तिच्या सरकारी डॉक्टर पतीवर गंभीर आरोप केले आहेत. पत्नी म्हणते की तिच्या नवऱ्याला बिकिनी घालायला आवडते. पत्नीने पतीविरोधात पोलिसात धाव घेतली आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते पाहुयात.
जिल्हा कारागृह परिसरातील सरकारी निवासस्थानात राहणारा डॉ. वरुणेश दुबे याच्यावर त्याची पत्नी सिम्पी पांडेने गंभीर आरोप केले आहेत. तिने एक व्हायरल व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये तिचा पती एका पुरूषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत तिला दिसला. व्हिडिओची पार्श्वभूमी पाहून तिला लक्षात आलं की हा व्हिडिओ त्यांच्याच घरात बनवण्यात आला आहे. 18 मे रोजी सिम्पीने तिच्या पतीला गोरखपूर येथील त्यांच्या घरी बनवलेल्या या व्हिडिओबद्दल विचारपूस केली. यानंतर दोघांमध्ये वाद झाला, ज्याचं रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. घटनेनंतर सिम्पीचे वडील आणि भाऊही तिच्या नवऱ्याशी बोलले. ज्याचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला.
advertisement
सिम्पीने सांगितलं की, तिचा नवरा एका ट्रान्सजेंडर महिलेचं रूप धारण करून अश्लील व्हिडीओ तयार करतो आणि पैसे कमवण्यासाठी ते ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकतो. डॉक्टरच्या स्वतःच्या पत्नीने हा दावा केल्यावर हा आरोप अधिक खळबळजनक बनला.
पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे. ज्यामध्ये विश्वासघात, मानसिक छळ आणि शारीरिक हिंसाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणाचा प्रत्येक बाजूने तपास सुरू आहे आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सत्य लवकरच बाहेर येईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी डॉक्टरचं निवासस्थान सील केलं आहे. तसंच, एक उच्चस्तरीय विभागीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, जी व्हिडिओची फॉरेन्सिक चौकशी करत आहे.
advertisement
दरम्यान डॉ. वरुणेशने त्याच्या पत्नीचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. त्याने सांगितलं की व्हायरल व्हिडिओ डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले गेले आहेत आणि हे त्याला बदनाम करण्याचं षड्यंत्र आहे. या कटात त्याच्या पत्नीचे काही तंत्रज्ञानप्रेमी नातेवाईक सहभागी असू शकतात असा संशय त्याने व्यक्त केला आहे. डॉक्टरनं आपण पूर्णपणे निर्दोष असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
नवरा डॉक्टर पण त्याला बिकिनी घालायची हौस, बायकोची पोलिसात धाव, म्हणाली, रात्रभर ते...
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement