वहिनीसोबत रिलेशन, लग्न कर म्हणताच ढसाढसा रडू लागला दीर, म्हणाला, माझे संबंध आहेत पण...

Last Updated:

Bhabhi Devar Relation : दीर त्याच्या वहिनीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. गावकऱ्यांनी दोघांनाही एका खोलीत पकडलं. महिलेच्या पतीला बोलावण्यात आलं. पतीने पत्नीला सोबत ठेवायला नकरा दिला. पंचायतीने दिराला वहिनीशी लग्न करायला सांगितलं. 

News18
News18
पाटणा : तरुण-तरुणीचं एकमेकांवर प्रेम असणं आणि त्यांचं एकमेकांशी लग्न न होता, त्यांच्याच नात्यातील दुसऱ्या कुणासोबत तरी लग्न होणं, यावेळी वेदनाही अधिक होतात. असंच एक कपल, ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम. पण तरुणीचं लग्न तरुणाच्या भावासोबत झालं. पण यानंतरही त्यांचं प्रेम मात्र सुरूच होतं. शेवटी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आणि त्यांचं लग्न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा मात्र तरुण रडू लागला.
बिहारमधील हे प्रकरण आहे.  24 वर्षीय दिलीप कुमारचे गेल्या अडीच वर्षांपासून चरपोखरीतील रहिवासी राणीसोबत प्रेमसंबंध होते. पण राणीचं लग्न 27 फेब्रुवारी 2022 रोजी देऊलिया लाख गावातील सोनू चौधरीशी झालं. सोनू हा राणीचा प्रियकर दिलीपचा चुलत भाऊ. सोनू आणि दिलीप लहानपणापासून एकत्र वाढले. सोनू आणि राणीच्या लग्नात दिलीपने आनंदाने नाच केला.
advertisement
लग्नानंतर राणी तिच्या सासरच्या घरी आली. 3-4 महिने सगळं व्यवस्थित चाललं होतं. दरम्यान दिलीप आणि राणीमधील जवळीक वाढू लागली. दिलीप त्याच्या वहिनीसोबत जास्त वेळ घालवू लागला. जेव्हा जेव्हा नवरा सोनू घरी नसायचा तेव्हा राणी दिलीपला तिच्या घरी बोलावायची. हे दोन महिने चालू राहिलं. दोघांमधील प्रेम आणि आपुलकी आणखी वाढली. त्यांचं प्रेम इतकं वाढलं की ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते.
advertisement
राणीचा नवरा सोनूला त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली. 6 महिन्यांपूर्वी राणी आणि दिलीपला सोनूने रंगेहाथ पकडलं होतं. दोघांमध्ये खूप वाद झाला. दरम्यान दिलीपने राणीला वचन दिलं की तो तिला ते सर्वकाही देईल जे तिला तिच्या नवऱ्याकडून मिळत आहे. यानंतर राणी तिच्या माहेरी कोयल गावात आली. दिलीप तिला तिच्या माहेरी गुपचूप भेटत असे.
advertisement
एकदा दोघंही एका खोलीत गुपचूप बोलत होते. तेव्हा ग्रामस्थांना याबाबत समजलं. ते राणीच्या घरी पोहोचले आणि त्यांनी त्या खोलीचं दार उघडलं. ग्रामस्थांनी दोघांना रंगेहाथ पकडलं. पंचायत बोलावण्यात आली. एका प्रदीर्घ आणि हायव्होल्टेज ड्रामानंतर गावकऱ्यांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी परस्पर संमतीने दिलीप-राणीचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. पण दिलीपने लग्नाला नकार दिला. जेव्हा राणी दिलीपकडे लग्नाचा विषय काढायची तेव्हासुद्धा तो टाळाटाळ करायचा.
advertisement
दिलीप म्हणाला की, राणीचा घटस्फोट झालेला नाही मग मी लग्न कसं करू शकतो. राणीचा पहिला नवरा सोनू म्हणाला की मी या मुलीला ठेवणार नाही. जर तिला दिलीपशी लग्न करायचं असेल तर मला काहीच हरकत नाही. निर्णय पूर्णपणे राणीवर सोपवण्यात आला. राणीला तिचा प्रियकर दिलीपसोबत राहायचं होतं. मग कोयल गावातील शिव मंदिरात हिंदू रितीरिवाजानुसार दोघांचं लग्न झालं. लग्नादरम्यान पंचायतीने संमतीपत्रही दिलं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
वहिनीसोबत रिलेशन, लग्न कर म्हणताच ढसाढसा रडू लागला दीर, म्हणाला, माझे संबंध आहेत पण...
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement