अमेरिकेतील डोनाल्ड उर्फ डॉन डेकर नावाची व्यक्ती. चोरीच्या आरोपात तुरुंगात शिक्षा भोगत होती. त्याचवेळी त्याच्या आजोबांचा मृत्यू झाला म्हणून अंत्यसंस्कारासाठी त्याला जेलमधून बाहेर काढण्यात आलं. त्यावेळी तो आपल्या एका मित्राच्या घरी थांबला. तिथं आणखी काही लोकही होते. त्यावेळी त्या घरात छत गळू लागलं. सर्वांनी घऱाची नीट पाहणी केली तर घरात बाहेरून पाणी येईल, पाण्याची गळती होईल अशी कोणतीच जागा नव्हती. पाणी तिथंच गळत होतं, जिथं डॉन डेकर बसला होता. तो घरातून बाहेर येताच पाणी गळणं थांबलं आणि सर्व नीट झालं.
advertisement
General Knowledge : ढगांतून पाऊस पडतो खरा पण एका ढगात किती पाणी असतं माहितीये?
जिथं जायचा तिथं पाऊस
त्यानंतर पुन्हा अशीच घटना घडली ती रेस्टॉरंटमध्ये. तो तिथं बसला असता तिथंही अचानक पाऊस पडू लागला आणि जसा तो रेस्टॉरंटमधून बाहेर आला, तसा पाऊस थांबला. नंतर त्याला पुन्हा जेलमध्ये आणण्यात आलं. तिथंही अशीच घटना घडली. आश्चर्य म्हणजे या पावसात फक्त ती व्यक्ती भिजायची. त्यामुळे सर्वजण घाबरले. अखेर तिथं पादरीला बोलावण्यात आलं. पादरीने बायबल वाचायला सुरुवात करतात संपूर्ण खोली पावसाने भिजली. पण बायबल मात्र कोरडं होतं. या दिवशी पाऊस आपोआप थांबला आणि डॉन डेकरच्या आयुष्यातील ही अनोखी शक्तीही गेली.
Monsoon In India : मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस कसा समजतो, यात फरक काय?
अद्याप उलगडलं नाही रहस्य
पेन्सिलव्हेनियामधील 1983 सालातील ही विचित्र घटना आहे. ज्याचं रहस्य अद्यापही उलगडलेलं नाही. या विचित्र शक्तीबाबत या व्यक्तीलाही काही माहिती नव्हतं. काही जणांनी या घटनेच्या सत्यतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. तर काहींनी याला पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी म्हटलं आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
