Monsoon In India : मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस कसा समजतो, यात फरक काय?

Last Updated:

Monsoon and Premonsoon rain difference : मान्सूनपूर्व पाऊस भारतात मान्सूनच्या पावसापूर्वी येतो. या दोन प्रकारच्या पावसात खूप फरक आहे. मान्सूनचा पाऊस हा मोठ्या आणि विस्तृत प्रक्रियेचा परिणाम असतो, तर मान्सूनपूर्व पाऊस हा वेगळ्या प्रकारचा असतो, त्यांचे ढग आणि स्वरूपही काहीसे वेगळे असते. मान्सूनपूर्व पाऊस हा स्थानिक पावसासारखा असतो.

News18
News18
नवी दिल्ली : भारत हा कृषिप्रधान देश असल्याने, देशातले लोक मान्सूनची आतुरतेनं वाट पाहत असतात. कारण मान्सूनचा पाऊस किती प्रमाणात पडतो, त्यावर पुढील वर्षाची संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून असते. पण देशात मान्सून आणि मान्सूनपूर्व असे दोन प्रकारे पाऊस असते. आता मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस म्हणजे काय? दोघांमध्ये काय फरक असतो, हे जाणून घेऊया.
देशातील मान्सून अर्थात पावसाळा हा अनेक मोठ्या आणि विस्तृत प्रक्रियांनी बनलेला असतो. मे-जून महिन्यात भारतीय द्वीपकल्पात उष्णता (Heat) वाढते. तर त्या तुलनेत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आसपासचे तापमान कमी असते. तापमानातल्या या फरकामुळे समुद्रातील पाण्यामुळे तयार झालेले ढग मोठ्या प्रमाणात उत्तर भारताकडे सरकतात आणि तिथे जाताना संपूर्ण भारतात पाऊस पडतो, याला मान्सूनचा पाऊस असं म्हणतात.
advertisement
मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस कधी होतो?
भारतीय द्वीपकल्पात मान्सूनपूर्व पाऊस हा उत्तरेकडच्या भागांच्या तुलनेत सर्वप्रथम येतो आणि लवकर निघून जातो. उत्तर भारतातजून महिना हा मान्सूनपूर्व पावसाचा समजला जातो. केरळ आणि ईशान्य भारतात सर्वसाधारणपणे 1 जून रोजी मान्सूनचे आगमन होतं. परंतु, महिन्याच्या अखेरीस मान्सून वेगाने उत्तर भारतात पोहोचतो. मान्सून आणि मान्सूनपूर्व पावसाच्या वैशिष्ट्यांमध्ये काहीसा फरक असतो.
advertisement
मान्सूनपूर्व पावसाची वैशिष्ट्य
उष्णता आणि आर्द्रता (Humidity) ही मान्सूनपूर्व पावसाची वैशिष्ट्य म्हणता येतील. ही वैशिष्टय दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळेला कायम असतात. पण जोरदार वाऱ्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळतो. मात्र पावसाळ्यात वारे आणि दीर्घकाळ पडणाऱ्या पावसामुळे तापमानात घट होते. याशिवाय ढग (Clouds) आणि त्यांचा प्रवाह यातही मोठा फरक दिसून येतो. मान्सूनपूर्व पावसाचे ढग वरच्या दिशेने सरकत असतात आणि सामान्यपणे संध्याकाळी पाऊस पडतो.
advertisement
ढगांमधला विशेष फरक
एकीकडे मान्सूनपूर्व पावसाचे ढग वरच्या दिशेने सरकतात आणि जास्त तापमानामुळे ते तयार होतात, तर दुसरीकडे मान्सूनचे ढग हे बहुस्तरीय असतात ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लांब अंतरापर्यंत प्रवास करत असतात. या ढगाच्या थरांमध्ये उच्च आर्द्रता असते. मान्सूनपूर्व पाऊस हा जोरदार आणि तीव्र असतो आणि तो एक-दोन दिवसांत निघून जातो. परंतु, मान्सूनमधला पाऊस हा जास्त काळ राहतो आणि वारंवार बरसतो.
advertisement
वेळेतला फरक
मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस हा एकाचवेळी होत नाही. मान्सूनचा पाऊस दिवसात कोणत्याही वेळी बरसतो. परंतु, मान्सूनपूर्व पाऊस हा दुपारनंतर किंवा संध्याकाळी होतो. याशिवाय मान्सून आणि मान्सूनपूर्व पावसादरम्यान वाऱ्यांमध्ये फरक दिसून येतो. मान्सूनपूर्व पावसावेळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीचे लोट उठतात.
advertisement
हवेतला फरक
उष्णता आणि तापमानात जास्त फरक असल्याने, मान्सूनपूर्व कालावधीत समुद्र आणि जमिनीवर वारे अधिक वेगानं वाहतात. त्यामुळे आर्द्रता आणि ढगाळ हवामान तयार होतं; पण मान्सूनमध्ये असे वारे वाहत नाहीत. अनेकदा मान्सूनमुळे निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे जोरदार वारे नक्कीच पाहायला मिळतात. मान्सूनपूर्व पाऊस हा केवळ मर्यादित क्षेत्रात स्थानिक वातावरणामुळे होतो. परंतु, मान्सूनमधला पाऊस बराच मोठा भाग व्यापतो आणि या काळात संपूर्ण परिसरात एकसारखं हवामान असतं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Monsoon In India : मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस कसा समजतो, यात फरक काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement