Rain Live Update: पहिल्या पावसानं उडवली दाणादाण, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, रस्त्यांवर साचलं पाणी

Last Updated:

Monsoon 2025 Heavy Rainfall Alert: मुसळधार पावसानं उडवली दाणादाण, मान्सूनपूर्व पावसाचा राज्यात धुमाकूळ, कोकणात मान्सून दाखल, सलग चौथ्या दिवशी पावसाचं धुमशान, घरात पाणी शिरलं. संसार उद्ध्वस्त झाले. पीक उडावी झाली. राज्यातील पावसाचे अपडेट्स लाईव्ह पाहा.

News18
News18
मुंबई: कोकणात मान्सून दाखल झाला आहे. तर मुंबईत मान्सून येत्या तीन दिवसात दाखल होईल. मान्सून पूर्व पावसानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागांमध्ये घरात पाणी शिरलं. रस्ते जलमय झाले आहे. वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या सगळ्यांचे अपडेट्स राज्यात कुठे काय घडतंय त्या प्रत्येक क्षणाचे अपडेट वाचा लाईव्ह.
May 26, 202511:15 AM IST

Rain Live Update: महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन जण अडकले

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे गावात महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन साधू गावात पूर आल्याने मंदिरात अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची टीम गुरसाळे गावात पोहचत आहे.

May 26, 202510:51 AM IST

Rain Live Update: लोकल वाहतूक विस्कळीत, अनेक लोकल गाड्या एकामागे उभ्या, ट्रॅकवर साचलं पाणी

मुंबईला पावसानं झोडपून काढलंय.पहाटेपासूनच मुंबईच्या विविध भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली. अनेक महत्वाच्या ठिकाणी पाणी साचलं असून रस्ते जलमय झाले आहेत. संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरणामुळे काळोख पसरला आहे. जेजे फ्लायवर, दादर, अंधेरी, सायन किंग्स सर्कल, महालक्ष्मी अशा विविध परिसरात पाणी साचलंय.अंबरनाथ – बदलापूर या भागातही विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत…सार्वजनिक वाहतूक सेवेसह रेल्वे वाहतूकीचा खोळंबा झालाय..त्यामुळे सकाळीच चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आलीय..

May 26, 202510:40 AM IST

Panvel Rain Live Update: पनवेल आणि कळंबोली भागात लोकांच्या घरात पाणी साचलं

कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल शहराला चांगलाच झोडपून काढलं. पनवेल आणि कळंबोली भागात पाणी साचल होतं तर सखल भागातील घरांमध्ये पाणी साचलंय. यामुळे पनवेलकरांची तारांबळ उडालीय. मातीच्या भरावामुळे पनवेल कळंबोली भागात पाणी वाढत असल्याने महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी अधिकची यंत्रणा लावण्यात आल्याच सांगितलंय.

advertisement
May 26, 202510:38 AM IST

Mumbai Rain alert: पावसामुळे वाहतूक कोंडी, ऐरोली मुलुंड ब्रिज वर वाहणांच्या लांबच लांब रांगा

मुंबईसह ठाणे, उपनगर आणि नवी मुंबईत पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. ऐरोली मुलुंड ब्रिज वर वाहणांच्या लांबच लांब रांगा. पहिल्याच पावसात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.

 

May 26, 202510:27 AM IST

Rain Live Update: घरात पाणी शेतात पाणी, साताऱ्यातील कोरेगावमध्ये गावकऱ्यांचे हाल

सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यामध्ये अवकाळी मुसळधार पावसात अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साठल्याने चिखल तयार झाला आहे. नांदगिरी खेड येथील सचिन चतुर यांच्या शेतामध्ये आले (अद्रक) काढणी सुरू असताना पावसामुळे शेतामध्ये चिखल झाल्यामुळे आल्याची पोती बाहेर काढताना शेतकऱ्यांचे पाय गुडघाभर रोवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मोठी कसरत करत यातून शेतकरी डोक्यावर पोती घेऊन मार्ग काढताना पाहायला मिळत आहेत. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

May 26, 202510:08 AM IST

Rain Live Update: मे अखेरीस रत्नागिरीमध्ये सुरू झाले धबधबे, पर्यटकांची गर्दी

कोकणातील धबधबे साधारणतः जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्यात प्रवाहीत होताना परंतु यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बारसल्याने मे महिन्यातच धबधबे प्रवाहित झाल्याचे चित्र सध्या रत्नागिरीत पाहायला मिळत आहे. सध्या रत्नागिरीतील पानवलचा धबधबा प्रवाहित झाला असून त्याचे सुंदर रूप अनुभवयास मिळत आहे.

advertisement
May 26, 202510:06 AM IST

Rain Live Update: लोणावळ्यात सखल भागातील घरांमध्ये पावसाचं पाणी साचलं

पर्यटन नगरीत चोवीस तासांत पावसाने तुफान बॅटिंग केली असून या पावसाने कहर केलाय, लोणावळ्यातील जनजीवन विस्कळीत 24 तासांत 233 मि.मी. (9.17 इंच) पावसाची नोंद झाली आहे. यंदा मान्सूनपूर्व पाऊस मे महिन्यातच दाखल झाल्याने प्रशासनाची तयारी अपुरी ठरली आहे. कैवल्यधाम परिसरातील बद्रीविशाल सोसायटीसह जुना खंडाळा भागात काही घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे संसार रस्त्यावर आलेत. वेळेवर नाले सफाई न केल्याने त्याचा परिणाम पावसाळ्यात दिसून आला. त्याचा फटका करदात्यांना सोसावा लागलाय आणि मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे…

May 26, 20259:57 AM IST

Baramati Rain update: बारामतीमध्ये अजित पवारांचा पहाटेपासून दौरा

बारामतीत निरा डावा कालवा फुटल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहाटेपासुनच पाहणी दौरा सुरु केला. आज दिवसभर अजित पवार बारामतीत पाहणी करणार आहे. पावसामुळे पिकं जमीनदोस्त झाली असून घरांचीही पडझड झाली आहे. बारामती एमआयडीसीतही इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे.

May 26, 20259:55 AM IST

Badlapur Rain update: बदलापूर मच्छी मार्केट भागातील पूर्वेतून पश्चिमेला जाणाऱ्या मार्गात पाणी

बदलापूर शहरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. या पावसामुळे मच्छी मार्केट भागातील पूर्वेतून पश्चिमेला जाणाऱ्या मार्गात पाणी भरल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. त्यामुळे या मार्गाचा वापर वाहन चालकांनी आणि बदलापूरकरांनी करू नये अन्यथा दुर्घटना होण्याची शक्यता आहे .पहाटे एक ते दीड तास विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा मेघगर्जनेसह बरसायला सुरुवात झालीय. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं अशा सूचना प्रशासनाकडून केला जात आहेत.

May 26, 20259:54 AM IST

Mumbai Rain Live Update: किंग्ज सर्कल भागात पाणी साचलं

मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलंय. या पावसानं शहराच्या अनेक भागात पाणी साचलंय. किंग्ज सर्कल भागातही पाणी साचलंय. मुंबईसह उपनगरात सखोल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पहाटेपासून मुंबईसह उपनगरात पाऊस सुरू झाला आहे.

May 26, 20259:53 AM IST

Kolhapur Rain update: कोल्हापुरात गांधी मैदानाचे झाले तळे

कोल्हापुरात गांधी मैदानाचे झाले तळे
पाणी जाण्यासाठी उपाय न केल्याने गांधी मैदान पाण्यात
मैदानासाठी खर्च केलेले पाच कोटीही पाण्यात
शहराच्या मध्यभागी असलेल्या मैदानाचे तलावात रूपांतर
मैदानात साधले पाच ते सहा फूट पाणी

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rain Live Update: पहिल्या पावसानं उडवली दाणादाण, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, रस्त्यांवर साचलं पाणी
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement