ही घटना अयोध्येतील रामजन्मभूमी पोलीस स्टेशनमध्ये घडली. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातील शाळा, मठ, मंदिरे आणि लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. त्याचवेळी अयोध्येतील रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं.
मंदिरात प्रार्थना करताच व्यक्तीवर धनाची वर्षा; कसा झाला चमत्कार? Video पाहून सगळे अवाक
पोलीस ठाण्यात माकड
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एक माकड आलं आणि एसएचओ देवेंद्र कुमार यांच्या खुर्चीवर बसलं. एसएचओ देवेंद्र पांडे यांनी सांगितलं की, ध्वजारोहणानंतर जेव्हा ते आपल्या खुर्चीवर परतले, तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या खुर्चीवर एक माकड आधीच बसलं आहे.
advertisement
पोलिसाने माकडाला केला सलाम
धार्मिक मान्यतेनुसार वानरांना वानरपुत्र हनुमानाच रूप मानलं जातं आणि अयोध्येत त्यांची पूजा केली जाते. स्वतःला हनुमानाचा भक्त म्हणवणाऱ्या देवेंद्र पांडे यांनी माकडाला वाकून नमस्कार केला. देवेंद्र पांडे यांनी या माकडाला सलाम केला, जो आता केवळ अयोध्येतच नाही तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे.
या गावाला मंदिरांचं गाव असं का म्हटलं जातं?, परदेशातून येतात लोकं, भारतात कुठे आहे ठिकाण?
पवनपुत्र हनुमानाचे आशीर्वाद
स्वातंत्र्यदिनानिमित्त पवनपुत्र हनुमानाचा आशीर्वाद त्यांना मिळाला आणि हीच त्यांच्यासाठी देवाची माया आहे, अशी त्यांची धारणा आहे.