Photos : या गावाला मंदिरांचं गाव असं का म्हटलं जातं?, परदेशातून येतात लोकं, भारतात कुठे आहे ठिकाण?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
भारतात लाखो मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराची आपली एक कहाणी आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक भारतात येतात आणि येथील भक्तीभाव, संस्कृती, आदरातिथ्य पाहून प्रभावित होतात. आज अशाच एका मंदिरांच्या गावाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. (शिखा श्रेया/रांची, प्रतिनिधी)
advertisement
दुमका जिल्ह्यातील मलूटी नावाच्या या जागेला मंदिरांचे गाव असे म्हटले जाते. मलूटी येथील मंदिरांची विशेषत: अशी आहे की, यांचा बाहेरील भाग हा टेराकोटा पॅनलने सजविण्यात आला आहे. येथील स्थानिक कुलभूषण यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या मंदिरांची संख्या एकूण 125 होती. यामध्ये 108 फक्त शिवमंदिरे होती. सध्या याठिकाणी एकूण मंदिरांची संख्या ही 72 आहे. तसेच 80 ते 90 घरांची संख्या आहे.
advertisement
ते म्हणाले, या मंदिरांचे बांधकाम येथील राजा बाज बसंत रायच्या काळात सुरू झाले होते असे मानले जाते. त्या काळात येथील लोकांवर कोणताही कर लादला जात नव्हता, असे हे राज्य होते. राजा बाज बसंत हे अतिशय धार्मिक व्यक्ती होते. त्यामुळे त्यांनी आपल्या इतर समकालीनांप्रमाणे राजवाडे किंवा किल्ले बांधण्याऐवजी मंदिरे बांधण्याची परंपरा सुरू केली.
advertisement
advertisement
कुलदेवीच्या मंदिराशिवाय येथील इतर कोणत्याही मंदिरात पूजा केली जात नाही. उलट कलेच्या दृष्टिकोनातून ते आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. त्यामुळे लोक या मंदिरांना भेट देण्यासाठी येतात. ग्लोबल हेरिटेज फंडातूनही येथील मंदिरांचे जतन केले जात आहे. या निधीतून 3.25 कोटी रुपये खर्चून त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.