मंदिरात प्रार्थना करताच व्यक्तीवर धनाची वर्षा; कसा झाला चमत्कार? Video पाहून सगळे अवाक
- Published by:Priya Lad
Last Updated:
व्यक्तीने मंदिरात दर्शन घेताना असं काही केलं की त्याचं नशीबच पालटलं. तो ज्या ज्या मंदिरात गेला त्या सर्व मंदिरात असंच घडलं.
बीजिंग : मंदिरात गेल्यानंतर बहुतेक लोक आपली इच्छा देवासमोर व्यक्त करतात, प्रार्थना करतात आणि देवाची कृपा कधी होईल, देव आपली इच्छा पूर्ण कधी करेल याची प्रतीक्षा करतात. कधी ना कधी देव आपल्यावर कृपा करेल असा विश्वास अनेकांना असतो. पण एक व्यक्ती ज्या कोणत्या मंदिरात गेली तिथं अशी प्रार्थना केली की लगेच कृपा झाली.
चीनच्या शांक्सी प्रांतातील हे प्रकरण. कायद्याचे शिक्षण घेतलेली ही व्यक्ती, एक वकील. सामान्यत: कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी पोलिसांची असते आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी वकिलांची असते. इथे एका कायदेतज्ज्ञाने कायदा मोडला आणि तोही कुठेही नाही, थेट देवासमोर. एका उच्च विद्यापीठातून पदवी घेतलेल्या व्यक्तीने देवाचीही फसवणूक केली.
advertisement
ज्याने मंदिरात दर्शन घेताना असं काही केलं की त्याचं नशीबच पालटलं. पण चमत्कार वाटणार्या या घटनेचं सत्य समोर येताच त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले.
व्यक्तीने मंदिरात केलं काय?
तो दक्षिण-पश्चिम चीनच्या अनेक प्रांतांमध्ये गेला. बौद्ध मठ आणि मंदिरांना भेट दिली. मंदिरात गेल्यानंतर बहुतेक लोक आपली इच्छा देवासमोर व्यक्त करतात आणि देवाची कृपा कधी होईल, याची प्रतीक्षा करतात.
advertisement
या व्यक्तीने मात्र देवाच्या कृपेची वाट न पाहता तिथं असलेल्या दानपेटीवर गुपचूप आपला QR कोड पेस्ट केला. हे त्याने अनेक मंदिरांमध्ये केलं आणि कोणीही त्याला पाहू शकलं नाही. अशाप्रकारे मंदिरातून 30 हजार युआन म्हणजेच सुमारे साडेतीन लाख रुपये त्याच्या खात्यात जमा झाले.
असं फुटलं बिंग
पण त्याला त्याचं रहस्य फार काळ लपवता आलं नाही. अखेर शांक्सी प्रांताच्या पोलिसांना तो फेमेन मंदिरात पोहोचल्याचे फुटेज मिळाले. नतमस्तक होऊन मंदिराच्या कोडवर त्याने त्याचा QR लावला. त्यानंतर तो अनेक वेळा हात जोडून देवापुढे प्रार्थना करताना दिसला. एवढंच नाही तर दानपेटीत त्याने दानही टाकलं.
advertisement
पोलिसांनी व्हिडिओच्या माध्यमातून त्याला पकडलं असता त्याने यापूर्वीही अशी फसवणूक केल्याचं उघड झालं, असं वृत्त साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलं आहे.
Location :
Delhi
First Published :
August 15, 2024 12:53 PM IST
मराठी बातम्या/Viral/
मंदिरात प्रार्थना करताच व्यक्तीवर धनाची वर्षा; कसा झाला चमत्कार? Video पाहून सगळे अवाक