TRENDING:

Expensive Hotel in India : भारतातील सर्वात महागडं हॉटेल कोणतं? ताज-ऑबेरॉय याच्या समोर काहीच नाही, आकडा हादरवणारा

Last Updated:

तुम्हाला ठाऊक आहे का, आशियातील सर्वात महागड्या हॉटेल सूटपैकी एक भारतात आहे? हो आणि हे भारतातील सर्वात महागडं हॉटेल आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजकाल आलिशान हॉटेल्समध्ये मुक्काम करणं ही फक्त सुविधा नसून एक वेगळीच जीवनशैली झाली आहे. काही हॉटेल्स त्यांच्या भव्य वास्तुकलेसाठी ओळखली जातात, तर काही ऐतिहासिक वारशामुळे जगभरातून लोक इथे आकर्षित होतात. पण तुम्हाला ठाऊक आहे का, आशियातील सर्वात महागड्या हॉटेल सूटपैकी एक भारतात आहे? हो आणि हे भारतातील सर्वात महागडं हॉटेल आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

तुमच्या मनात मुंबईतील ताज किंवा ऑबेरॉय हॉटेल्स येतील आणि तेच सर्वात महागडे आहेत असं तुम्हाला पण असं नाही. हा हॉटेल त्यापेक्षा खूप वेगळा आहे. आश्चर्य म्हणजे या हॉटेलच्या एका सुटची किंमत ताज-ऑबेरॉय समोर काहीच नाही आहे. किंमतीचा हा आकडा एवढा मोठा आहे की तुम्हाला नक्कीच धक्का बसेल आणि प्रश्न पडेल की खरंच एवढे पैसे देऊन लोक इथे रहायला जातात का? पण हे खरं आहे अभिनेते अमिताभ बच्चन देखील या हॉटेलमध्ये राहून आले आहेत.

advertisement

राजस्थानची राजधानी जयपूर येथे असलेलं 'द राज पॅलेस' हे असंच एक अद्वितीय हॉटेल आहे, आणि यातील शाही महाल किंवा महाराजा पॅव्हिलियन तर ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं.

द राज पॅलेस ही इमारत पूर्वी चौमू हवेली नावाने ओळखली जात होती. 1727 मध्ये ठाकुर मोहनसिंह यांनी ही हवेली उभारली. जवळपास तीन शतकांनंतर, 1995–1997 या काळात प्रिन्सेस जयेंद्र कुमारी यांच्या पुढाकाराने त्याची डागडुजी करण्यात आली आणि ते एक अद्वितीय हेरिटेज हॉटेल म्हणून विकसित झाले.

advertisement

द राज पॅलेस मधील महाराजा पॅव्हिलियन किंवा शाही महाल हा चार मजली भव्य सूट आहे. त्यात स्वतंत्र एलिव्हेटर, 16,000 स्क्वेअर फूट जागा, चार बेडरूम्स, खासगी लाउंज, डायनिंग एरिया, बार, ग्रंथालय, स्पा, रूफ टेरेस आणि जॅकुझीपर्यंत सर्व काही आहे.

सूटच्या सजावटीत सोनेरी पानांचे काम, मिरर-काम, चांदी-सोन्याचं फर्निचर आणि प्राचीन कलाकृतींचा समावेश आहे.

advertisement

राज पॅलेस

यामध्ये रहाण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात?

शाही महालमध्ये मुक्कामाची किंमत साधारणपणे ₹5 लाख ते ₹27 लाख प्रति रात्र आहे (मौसमानुसार दर बदलतो). काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याला आशियातील सर्वात महागडा हॉटेल सूट असे संबोधले आहे.

advertisement

एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये काय सुविधा मिळतात?

प्रत्येक सूटमध्ये खासगी हेरिटेज म्युझियम आहे, यात आयुर्वेदिक स्पा आणि उपचार आहेत. पारंपरिक राजस्थानी लोकनृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील यामध्ये होतात. हात्ती आणि उंट सफारीची सोय, ग्रँड रॉयल डायनिंग आणि पर्सनलाइज्ड बटलर सेवा मिळते

हे हॉटेल किंवा सुट इतकं महाग का?

हा फक्त सूट नाही तर राजघराण्याचा खरा बंगला आहे. प्रचंड देखभाल खर्च आणि प्राचीन हस्तकला टिकवण्यासाठी जास्त पैसा लागतो, त्यामुळे याची किंमत जास्त आहे. शिवाय प्रत्येक पाहुण्यासाठी वैयक्तिक सेवा आणि प्रायव्हसी मिळते, यामुळे देखील याची किंमत जास्त आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर पुन्हा गडगडले, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

जर तुम्हाला कधी राजेशाही आयुष्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर द राज पॅलेसचा शाही महाल हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, हा मुक्काम सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे; कारण इथे राहणं म्हणजे फक्त हॉटेलचा अनुभव नव्हे, तर इतिहासाशी प्रत्यक्ष नातं जोडणं आहे.

मराठी बातम्या/Viral/
Expensive Hotel in India : भारतातील सर्वात महागडं हॉटेल कोणतं? ताज-ऑबेरॉय याच्या समोर काहीच नाही, आकडा हादरवणारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल