TRENDING:

Google वर सर्वात जास्त लोक काय सर्च करतात? Top 10 प्रश्नाची यादी समोर; पाहून म्हणाल, 'अरे असं पण विचारतात का?

Last Updated:

आता तर AI आल्यापासून तर अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. यामुळे लोकांना अगदी कोणत्या ही वेळेत प्रश्न पडला तरी हातात फोन घेतात आणि थेट सर्च करु लागतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मनुष्याला प्रश्न पडणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. छोटीशी शंका असो किंवा एखादं मोठं कोडं. एकदा का माणसामध्ये जिज्ञासा उत्पन्न झाली की मग माणूस त्याचं उत्तर शोधू लागतो. पूर्वी लोकांना एखाद्या प्रश्नाच उत्तर जाणून घेण्यासाठी ग्रंथालयं, पुस्तकं किंवा जाणकार लोकांचा आधार घ्यावा लागायचा, पण आता सगळ्याचं उत्तर शोधण्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे आणि ते आहे गुगल.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

तुम्हाला अगदी कोणता ही प्रश्न पडू देत गुगलकडे त्याचं उत्तर असतंच. आता तर AI आल्यापासून तर अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. यामुळे लोकांना अगदी कोणत्या ही वेळेत प्रश्न पडला तरी हातात फोन घेतात आणि थेट सर्च करु लागतात. एवढच नाही तर त्या प्रश्नाशी संबंधीत आणखी काही गोष्टी असतील तर गुगल ते देखील जाणून घ्यायला आपली मदत करतं.

advertisement

मग तुम्ही यामध्ये गुगलला काहीही प्रश्न विचारा म्हणजे अगदी तुमच्या जीवनातील मोठ्या गोष्टींपासून ते दैनंदिन वापराच्या छोट्या गोष्टींपर्यंत सर्व प्रश्नाची उत्तरं गुगल देतं. पण कधी तुम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता झाली आहे का की, जगभरातील लोक सर्वात जास्त कोणते प्रश्न गूगलवर टाईप करतात?

चला जाणून घेऊ गुगलवर सर्वात जास्त सर्च केला जाणारे 10 प्रश्न

advertisement

“काय पाहू?” (What to Watch) हा प्रश्न 6,200,000 लोकांनी विचारला गेला

“माझं रिफंड कुठे आहे?” (Where’s My Refund) हा प्रश्न 3,400,000 लोकांनी सर्च केला

“माझं आयपी काय आहे?” (What is My IP) हा प्रश्न 3,200,000 लोकांनी सर्च केला

“Qué Significa” (याचा अर्थ काय?) हा प्रश्न 2,900,000 लोकांनी सर्च केला

“Cuándo Cobro” (मला पैसे कधी मिळणार?) हा प्रश्न 1,800,000 लोकांनी सर्च केला

advertisement

“माझी ट्रेन कुठे आहे?” (Where is My Train) हा प्रश्न 1,500,000 लोकांनी सर्च केला

“ख्रिसमसला अजून किती दिवस?” (How Many Days Until Christmas) हा प्रश्न 1,400,000 लोकांनी सर्च केला

“किती वाजले आहेत?” (What Time is It) हा प्रश्न 1,400,000 लोकांनी सर्च केला

“इलेक्शन 2024 कोण जिंकले?” (Who Won the Election 2024?) हा प्रश्न 1,300,000 लोकांनी सर्च केला

advertisement

“O Que Significa” (याचा अर्थ काय?, पोर्तुगीजमध्ये) हा प्रश्न 1,300,000 लोकांनी सर्च केला

लोकांनी काही कॉमन आयुष्यात पडणारे प्रश्न सर्च केले आहेत. तर काही लोकांनी काहीतरी विचित्रच सर्च केलं आहे.

आता तु्म्ही या पैकी कोणता प्रश्न सर्च केला होता का? किंवा तुम्हीयांपैकी आहात का ज्यांनी एखादा प्रश्न सर्च केला होता. आम्हाला कमेंटमध्ये कळवा.

मराठी बातम्या/Viral/
Google वर सर्वात जास्त लोक काय सर्च करतात? Top 10 प्रश्नाची यादी समोर; पाहून म्हणाल, 'अरे असं पण विचारतात का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल