आता हे ऐकल्यानंतर तर तुम्हाला नक्कीच विचित्र वाटेल. हे प्रकरण नक्कीच मनाला न पटणारं आहे, पण हे खरोखरं घडलं आहे आणि त्याबद्दल या मुलीने आणि तिच्या आईने स्वत: सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
अमेरिकेतून नुकतीच अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एक आई आणि तिचीच मुलगी, दोघीही एका पुरुषापासून प्रेग्नंट झाल्या आहेत. इतकंच नव्हे, तर दोघींना आपल्या बाळाचा जन्म अवघ्या एका आठवड्याच्या फरकाने होणार होता. या घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आणि लोक थक्क झाले.
advertisement
हा व्हिडिओ जेड टीन नावाच्या मुलीने तिच्या @xojadeteen या अकाउंटवर शेअर केला. त्यात ती आपल्या आई डॅनी स्विंग्स सोबत दिसते. दोघींचेही पोट दिसत होते आणि स्क्रीनवर लिहिलं होतं – “मी आणि माझी आई एका व्यक्तीपासून प्रेग्नंट आहोत आणि आमच्या बाळांचा जन्म फक्त एका आठवड्याच्या अंतराने होईल.”
व्हिडिओमध्ये डॅनी म्हणते “मी आत्ता 34 आठवड्यांची प्रेग्नंट आहे, माझ्याकडे फक्त एक महिना बाकी आहे.” या त्यांनी हा खुलासा करताच लोकांचा विश्वासच बसेना. ज्यानंतर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यावर कमेंट्सचा पाऊस पडाला आहे.
तर कहाणी अशी आहे की डॅनी स्विंग्सची एक मुलगी जेड आहे. जेडच्या जन्मानंतर डॅनी आणि तिचा पार्टनर वेगळे झाले. काही काळानंतर 44 वर्षीय डॅनीच्या आयुष्यात निकोलस यार्डी नावाचा पुरुष आला. दोघांचं एकमेकांवर प्रेम जुळलं आणि नंतर एकत्र राहायला लागले. डॅनी तिच्या मुलीला म्हणजेच जेडलाही या घरात घेऊन आली.
जेड वयाने 22 वर्षांची होती आणि निकोलससोबत तिचं वयाचं अंतर फारसं नव्हतं. त्यामुळे हळूहळू जेड आणि निकोलस एकमेकांच्या जवळ येऊ लागले. त्यांच्या नात्याने मैत्रीच्या पलीकडे जाऊन प्रेमाचं रूप घेतलं आणि हे सर्व घडत असतानाच निकोलस डॅनीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. परिणाम असा झाला की, डॅनीही निकोलसपासून प्रेग्नंट झाली आणि तिची मुलगी जेडही त्याच पुरुषापासून प्रेग्नंट झाली. दोघींनाही याचा धक्का बसला नाही, उलट त्या दोघी आपल्या बाळाच्या जन्माची आतुरतेने वाट पाहू लागल्या. या दोन्ही मुलांचे वडील एकच आहेत ते म्हणजे निकोलस.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, बातम्यांनुसार हे तिघं अजूनही एकत्र राहतात आणि एकाच बेडवर झोपतात. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 75 लाखांपेक्षा जास्त views मिळाले आहेत. हजारो लोकांनी यावर कमेंट करून आश्चर्य व्यक्त केलं. काहींनी याला समाजासाठी धोकादायक म्हटलं, तर काहींनी “आजच्या नात्यांचं वास्तव” असल्याचं सांगितलं. मात्र बहुसंख्य लोकांनी हा संबंध चुकीचा असल्याचं मान्य केलं.
हा व्हिडिओ दोन महिन्यांपूर्वीचा असल्याने बाळं आता जन्माला आले असतील, असं मानलं जातं. पण अजूनपर्यंत सोशल मीडियावर त्यांनी बाळांबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. त्यामुळे हे खरंच घडलं होतं का? की फक्त सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी हा खेळ रचला गेला होता? असा प्रश्न अनेकांच्या मनात उत्पन्न झाला. पण अखेर एक दिवसापूर्वी युट्यूबर निकोलसनं खुलासा केला की त्याची गर्लफ्रेंड आणि तिची आई प्रेग्नेन्ट नाही. तो फक्त एक स्टंट होता. त्यानंतर हे उघड झालं की असं काही घडलेलं नाही.
निकोलसनं यासंबंधीत पोस्ट देखील सोशल मीडियावर पोस्ट केली ज्यावर लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.