चीनच्या बीजिंगमधील हे कुटुंब. पती-पत्नी, दोन मुलं आणि त्यांची आजी, असे 5 सदस्य या कुटुंबात राहतात. महिलेने आपल्या सासूचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिनं सांगितल्यानुसार तिची सासू ते दोघं नवरा-बायको झोपले की दररोज रात्री गुपचूप त्यांच्या बेडरूममध्ये येते आणि असं काही करते की व्हिडीओ पाहणारेही थक्क झाले आहेत.
advertisement
250 वर्षे जुनं घरं, जमिनीखालून अचानक येऊ लागला विचित्र आवाज, महिलेने उघडून पाहिलं अन्...
महिलेने तिच्या टिकटॉकवर हे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. पोस्टमध्ये तिनं सांगितल्यानुसार दर रात्री 11 ते मध्यरात्री 2 च्या सुमारास कपल जेव्हा गाढ झोपेत असतं तेव्हा महिलेची सासू नेहमी तिच्या बेडरूममध्ये येते. हे वाचूनच तुम्हालाही राग आला असेल. मुलगा आणि सूनेच्या खोलीत ते झोपल्यानंतर इतक्या रात्री कोण कसं काय जाईल, असा विचार करून तुम्हालाही संताप आला असेल.
कपलच्या बेडरूममध्ये जाणाऱ्या सासूचं कौतुक
मात्र या सासूने मुलगा आणि सुनेच्या खोलीत जाण्याचं कारण, ती काय करते हे पाहिल्यानंतर अनेकांना त्या सासूचा राग येण्याऐवजी उलट कौतुकच वाटतं आहे. अशी सासू आपलीही असती तर, अशी सासू आपल्यालाही हवी अशीच प्रतिक्रिया अनेक युझर्सची आहे. आता असं ही सासू नेमकं काय करायची हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
कपलच्या बेडरूममध्ये सासू नेमकं करायची काय?
मध्यरात्री सासू मुलगा आणि सुनेच्या बेडरूममध्ये येण्याचं कारण होतं ते म्हणजे तिचा एक वर्षाचा नातू. एके दिवशी रात्री तो अचानक रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून ती धावत आली आणि त्याला घेऊन लिव्हिंग रूममध्ये गेली. त्याला शांत केलं. काही वेळा ती त्याला रात्री झोपेतून उठवून दूधही देत असे. कधी त्याला ताप आला की फक्त त्याचं टेम्प्रेचर तपासण्यासाठी, तो बरा आहे की नाही हे पाहण्यासाठी ती मध्यरात्री 2-3 च्या सुमारास येत असे.
स्टेशनवर थांबली ट्रेन, प्लॅटफॉर्मवर उतरलं कपल, नाव ऐकताच जीआरपी पोलिसांची पळापळ
फक्त नातूच नव्हे तर मुलगा आणि सुनेसाठी ही महिला जे काही करते त्यामुळे नेटिझन्सनाही कौतुक वाटतं आहे. नातवामुळे मुलगा आणि सुनेला त्रास होऊ नये, त्यांची झोपमोड होऊ नये याची काळजी ती घेते. ती अगदी शांतपणे आणि काळजीपूर्वक रूममध्ये येते मूल रडतंय, मुलाला बरं नाही आणि आईबाप गाढ झोपले आहेत म्हणून ती त्यांच्यावर कधी रागवत नाही किंवा ओरडतही नाही. उलट ती नातवंडासोबत त्यांचीही काळजी घेते. सुनेच्या डोक्याखालची उशी नीट करते, तिला पांघरूण घालते, असं व्हिडीओ दिसल्याचं वृत्त द बस्टेडन्यूजने दिलं आहे.