फ्रान्समधील नेर्सॅक शहरातील ही घटना. एक 9 वर्षांचा मुलगा दोन वर्षे थंड फ्लॅटमध्ये एकटाच राहिला कारण त्याची आई त्याला सोडून तिच्या प्रियकरासोबत राहण्यासाठी पळून गेली. त्याची आई तिच्या प्रियकराच्या घरी आरामात राहत होती. फ्लॅटपासून फक्त 5 किमी अंतरावर राहत असूनही, ती कधीतरीच तिच्या मुलाला भेटायला जायची आणि त्याच्यासाठी जेवण आणायची. पण त्याला स्वतःसोबत कधीच नेलं नाही.
advertisement
अनेक महिने शेजाऱ्यांनाही मुलगा फ्लॅटमध्ये एकटा असल्याची माहिती नव्हती. तो शाळेतही एकटाच जायचा. पण जेव्हा शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना बोलावलं तेव्हा सत्य उघड झालं. शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून जेव्हा पोलीस फ्लॅटमध्ये दाखल झाले तेव्हा तेही थक्क झाले.]
Shocking! आईने केलं असं कृत्य, अवघ्या 4 वर्षांचा चिमुकलाही जेरबंद
या काळात मूल कसं जिवंत राहिले हे देखील आश्चर्यकारक आहे. फ्लॅटच्या आत एक रिकामा फ्रीज, केक रॅपर्स आणि रिकामे बॉक्सने भरलेला डस्टबिन दिसला. तपासात स्पष्टपणे दिसून आलं की मुलाचे पालक किंवा इतर कोणताही प्रौढ व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून तिथे गेली नव्हती. फ्लॅटमध्ये प्रौढांचे कपडे, बूट आणि टूथब्रशही गायब होते. पोलीस चौकशीदरम्यान, मुलाने सांगितलं की तो दोन वर्षांपासून एकटा राहत होता आणि त्याची आई त्याला क्वचितच भेटायला येत असे. या खुलाशाने सर्वांना धक्का बसला, कारण या अवस्थेत आई आपल्या मुलाला कसं सोडून देऊ शकते हे कोणालाही समजू शकलं नाही. हा मुलगा 2020 ते 2022 पर्यंत मिठाई, कॅन फूड आणि शेजाऱ्यांच्या थोड्याशा मदतीमुळे जगला.
यानंतर, पोलिसांनी मुलाची 39 वर्षीय आई अलेक्झांड्रा हिचा शोध सुरू केला. ती सायरेउइल शहरातील तिच्या प्रियकराच्या घरी सापडली. जेव्हा परिसरातील लोकांची चौकशी केली तेव्हा असं दिसून आलं की तिने आपल्या मुलाबद्दलचं सत्य शेजाऱ्यांपासूनही लपवलं होतं.
चौकशीदरम्यान तिने मुलगा आपल्यासोबत राहत होता. तो खोटं का बोलत आहे हे मला माहित नाही, असं सांगितलं. पण पोलिसांनी तपास केला तेव्हा ती खोटं बोलत असल्याचं समोर आलं. त्या महिलेने पुढे सांगितले की, ती दररोज तिच्या मुलाला शाळेत सोडत असे. पण महिलेच्या फोनच्या लोकेशन डेटावरून ते खोटे असल्याचे सिद्ध झाले. असे असूनही, ती महिला आपल्या मुलाला सोडून तिच्या प्रियकरासोबत राहत आहे हे स्वीकारू इच्छित नव्हती. दुसरीकडे, शेजाऱ्यांनी सांगितले की ती नेहमीच फ्लॅटमधून एकटीच बाहेर पडायची.
अशा परिस्थितीत पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. पण ती महिला न्यायालयातही आपली चूक मान्य करायला तयार नव्हती. न्यायालयात सुनावणीदरम्यान, न्यायाधीशांनी विचारले की तिचा मुलगा असं का म्हणतो की तिने त्याला दोन वर्षे एकटं सोडलं होते? या प्रश्नाचं उत्तर त्या महिलेने दिल, "तो असं का म्हणतो हे मला माहित नाही."
या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने तिला बाल दुर्लक्षासाठी 18 महिन्यांची निलंबित शिक्षा सुनावली, ज्या अंतर्गत ती महिला तुरुंगात जाणार नाही परंतु काही अटी पूर्ण करताना तिला पोलिसांच्या देखरेखीखाली राहावं लागेल. महिलेला फक्त 6 महिने इलेक्ट्रॉनिक अँकल ब्रेसलेट घालावं लागेल. दुसरीकडे मुलाला गेल्या वर्षी फोस्टर केयरमध्ये ठेवण्यात आलं. तेव्हापासून त्याची आई त्याला फक्त दोनदा भेटायला आली. अशा परिस्थितीत मुलाने त्याच्या आईशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत.
ज्या शाळेत तो मुलगा जातो तिथल्या एका शिक्षकाने सांगितलं, "तो खूप प्रौढ, बलवान आणि स्वावलंबी आहे, कदाचित गरजेपेक्षा जास्त. उष्णतेशिवाय थंडी सहन करणं, अनेक रजाईत गुंडाळून झोपणं, थंड पाण्यात आंघोळ करणं किंवा अंधारात राहणं या सर्वांमुळे तो तरुण वयातच प्रौढ झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या अडचणी असूनही, तो दररोज शाळेत जायचा आणि इतका चांगला अभ्यास करायचा की त्याच्या शिक्षकांनाही काहीच कळत नव्हते. व्हायरल होत असलेली ही घटना 2023 सालची आहे.