मदिहानमधील कुंद्रुफमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या बहिणीचं सासर सोनभद्रमधील घोरावळ इथं आहे. तरुणी आपल्या बहिणीच्या घरी वारंवार येत असे. दरम्यान तिची ओळख शेजारी राहणाऱ्या महिलेशी झाली, जी दोन मुलांची आई आहे. तिचा एक मुलग दोन वर्षांचा तर एक सहा महिन्यांचा आहे.
हनीमूनची घाई! लग्नाआधीच बुक केलं 11 लाखांचं तिकीट, आता म्हणे, वाटतेय भीती, पण कशाची?
advertisement
दोघांमधील जवळीक वाढली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. बुधवारी दोघंही घरातून पळून गेले. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यांना समजलं की दोघींना एकमेकींशी लग्न करायचं आहे. शुक्रवारी दोन्ही मुली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या
मुलीच्या भावाने तक्रार दाखल केली की तिच्या बहिणीला दोन मुलांच्या आईने फसवलं आहे. ती त्याच्यासोबत जगण्याचा आणि मरण्याचा आग्रह धरत आहे. मदिहान पोलीस ठाण्यात तासाभराहून अधिक काळ चाललेल्या हायव्होल्टेज ड्रामानंतरही मुलीने लग्नाचा हट्ट सोडला नाही. एकमेकांच्या प्रेमात वेड्या झालेल्या दोन महिला समलैंगिक विवाह करण्यावर ठाम आहेत.
अरे देवा! सून म्हणून हे कुणाला आणलं, नवरीबाईचं खरं रूप समोर, सासर हादरलं
या संदर्भात मदिहान पोलिस स्टेशनचे प्रभारी बाली मौर्य म्हणाले की, माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. नियमांनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.