तुम्ही अशा स्टंटबाजी करणाऱ्या लोकांचे असंख्य व्हिडीओ पाहिले असतील. अनेकांना तर पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. हा स्टंटचा व्हिडीओ आहे. ज्याचे परिणाम काय झाले, हे देखील दाखवण्यात आलं आहे.
खरंतर मागच्या काही दिवसांपासून एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो चालत्या ट्रेनमध्ये स्टंटबाजी करत आहे. लोकांनी या व्हिडीओला खूप शेअर आणि कमेंट केलं आहे. ज्यामुळे तो व्हिडीओ खूप ट्रेंड झाला. पण अशी स्टंटबाजी करण्याची या तरुणाला खूप मोठी शिक्षा मिळाली आहे, जी आयुष्यभरासाठी त्याची पाठ सोडणार नाही.
advertisement
हा स्टंट करणारा मुंबईतील एन्टॉप हिल येथे रहाणारा तरुण आहे. अशाच एका स्टंटदरम्यान या तरुणाचा बॅलेंस गेला आणि त्यामुळे त्याच्यासोबत अपघात घडला, ज्यानंतर या तरुणाला आपला एक हात आणि एक पाय देखील गमवावा लागला आहे. या तरुणाच्या या मुलाखतीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर आता समोर आला आहे. हा व्हिडीओ मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो अशा स्टंटबाजीला आळा घालण्यासाठी आणि लोकांसमोर उदाहरण देण्यासाठी केला गेला आहे.
या व्हिडीओतील तरुणाला आपल्या अशा कृत्याचा आता पश्चाताप होत आहे, पण आता वेळ निघून गेली आहे आणि त्याला आपल्या शरीराचे महत्वाचे दोन अवयव गमावले आहे.
हा व्हिडीओ शेअर करून पोलिसांनी लोकांना असे स्टंट करू नका असे आवाहन केले आहे.