TRENDING:

लोकांनी हिणवलं, पण तिनं व्रत सोडलं नाही, मुंबईतल्या ‘ॲनिमल मॉम’ची कहाणी

Last Updated:

Animal Mom: मुंबईसारख्या शहरात एक महिला रोज 300 हून अधिक कुत्री आणि मांजरांना अन्नदान करतेय. याच ‘ॲनिमल मॉम’ बद्दल जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निकिता तिवारी, प्रतिनिधी
advertisement

मुंबई: कुत्रा आणि मांजर असे प्राणी पाळणारे अनेकजण आपण पाहिले असतील. असं प्राणीप्रेम आपल्यासाठी नक्कीच नवं नसेल. परंतु, याच प्राण्यांना जीव लावणाऱ्या एका महिलेला लोकांनी शिव्या दिल्या अन् तक्रारीही केल्या. तरी देखील त्यांनी आपलं व्रत सोडलं नाही. कुणी ‘ॲनिमल मॉम’ म्हणून हिणवलं. मात्र, याच हिणवण्याला कौतुकाची थाप समजून त्यांनी ‘ॲनिमल मॉम’ याच नावाची संस्था सुरू केली आणि शेकडो प्राण्यांना नवजीवन दिलं. मालन सोनावणे असं या मुंबईतील मुक्या प्राण्यांच्या आईचं नाव आहे. त्यांच्याच बाबत आज आपण लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

advertisement

मुंबईच्या 61 वर्षीय मालन सोनावणे या फक्त एखाद दुसऱ्या प्राण्याचे नाही तर तब्बल 300 कुत्रा आणि मांजरांचे पालन पोषण करतात. याशिवाय मुंबईत कुठेही कोणत्याही प्राण्याला इजा झाली तर अनेक जण त्यांना संपर्क साधतात. मालन या जखमी प्राण्यांना रुग्णालयात घेऊन जातात. त्यांच्यावर उपाचर करतात आणि त्याची पुढे विशेष काळजी देखील घेतात. त्यांच्या या कार्याचं कुणी कौतुक करतं तर कुणी त्यांना दुषणंही देतं. परंतु, हे काम त्या एखादं व्रत म्हणूनच करत आहेत.

advertisement

वंचित मुलांचा भगवान! इथं भरते विना छताची शाळा, तरुणाच्या कामाचं तुम्हीही कराल कौतुक

View More

प्राण्यांसाठी अन्नदान

गेल्या 10 वर्षांपासून मालन सोनावणे या कुत्रा, मांजर यांना जुहू, सांताक्रुज पूर्व, बीकेसी, वांद्रे पूर्व या परिसरात अन्न देतात. दररोज न चुकता जवळपास तब्बल 300 कुत्रा आणि मांजरी यांना ते अन्न पुरवतात. दुपारी घरातून 2 वाजता निघाल्यानंतर विविध ठिकाणी फिरून त्या रात्री 1-2 वाजता आपल्या घरी परततात. त्यांची हीच दिनचर्या गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याचं मालन सांगतात.

advertisement

कशी झाली सुरुवात?

10 ते 12 वर्षांपूर्वी मालन यांनी घराजवळ असलेल्या कुत्रा आणि मांजर यांना खाद्य द्यायला सुरुवात केली होती. पुढे त्यांना कुठं उपाशी कुत्रा आणि मांजर दिसल्यास त्यांनी त्यांनाही खाद्य द्यायला सुरुवात केली. हळूहळू ही संख्या वाढत गेली. मात्र, लोक मालन यांना ॲनिमल मॉम म्हणून चिडवू लागले. पण हेच चिडवणं त्यांनी त्यांची स्तुती म्हणून स्वीकारले आणि ‘ॲनिमल मॉम फाउंडेशन’ नावाची संस्था सुरू केली. या संस्थेअंतर्गत दिवसाला जवळपास 100 ते 150 किलो जेवण मालन सोनवणे या सर्व मुक्या प्राण्यांना पुरवतात.

advertisement

शेतकऱ्याचा नादच खुळा! DJ लावून कारखान्याला पोहोचवला ऊस, कारण काय? Video

अनेकदा तक्रारी पण व्रत कायम

मुंबईसारख्या शहरात कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नसताना देखील मालन या मुक्या प्राण्यांना अन्नदान करतात. तरीही अनेक गोष्टींचा आणि आव्हानांचा त्यांना सामना करावा लागतो. अनेकदा मालन यांच्या विरोधात मुक्या प्राण्यांना जेवण देतात म्हणून तक्रार देखील केली गेली. मात्र मुक्या प्राण्यांना देखील भूक असते आणि ती भूक कोणीतरी भागवणे गरजेचे आहे हाच विचार डोक्यात ठेवून एक व्रत म्हणूनच मालन आपली सेवा सुरू ठेवत आहेत.

दरम्यान, मालन यांच्या या प्राणीप्रेमामुळे अनेक मुक्या जीवांना अन्न मिळत आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. तसेच त्यांचं हे प्राणीप्रेम अनेकांसाठी मार्गदर्शक देखील ठरणारं आहे.

मराठी बातम्या/Viral/
लोकांनी हिणवलं, पण तिनं व्रत सोडलं नाही, मुंबईतल्या ‘ॲनिमल मॉम’ची कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल