TRENDING:

भारतातील 'शापित' गाव! इथं रातोरात 'गायब' झाले सर्व लोक; आजही कुणीच राहत नाही

Last Updated:

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे गाव पुन्हा चर्चेत आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : भारतात अशी बरीच ठिकाणं आहेत जी रहस्यमयी आहेत. या ठिकाणांची वेगवेगळी कहाणी असते. भारतातील अशाच रहस्यमयी ठिकाणांपैकी एक असलेलं हे गाव. जिथं रातोरात लोक गायब झाले. एका रात्रीत संपूर्ण गाव रिकामं झालं. या गावाला लोक शापित म्हणतात. सोशल मीडियावर नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे हे गाव पुन्हा चर्चेत आलं आहे.
भारतातील रहस्यमयी गाव
भारतातील रहस्यमयी गाव
advertisement

हे गाव आहे राजस्थानात. कुलधारा गाव लोकांमध्ये चर्चेत आहे. एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ. जिथं काही तरुणांनी लाथाबुक्क्या मारून इथली ऐतिहासिक भिंत पाडली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होताच हे गाव चांगलंच चर्चेत आलं आहे. कुळधरा गावात अनेक तुटलेली घरं आहेत. ज्यांचा भारत सरकारच्या पुरातत्व संरक्षित ठिकाणी समावेश आहे. त्याच्या देखभालीचं काम ASI च्या सहकार्याने जैसलमेर विकास समिती करते. व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर वाद वाढत आहे.

advertisement

गायब झाली होती भारतातील ही 10 शहरं; अचानक मिळाले पुरावे आणि उलगडलं नवं रहस्य

जैसलमेरपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेलं कुलधारा गाव सरस्वती नदीच्या काठी पालीवाल ब्राह्मण समाजाच्या लोकांनी वसवलं होतं. त्यावेळी या राज्याचे मंत्री सलीम सिंह होते, ते गावावर अतिशय कठोरपणे वागायचे. त्यांची वाईट नजर गावच्या प्रमुखाच्या मुलीवर पडली, जी खूप सुंदर होती. त्यांना त्या मुलीशी लग्न करायचं होतं. त्याने गावकऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की, जर कोणी तिला लपवण्याचा प्रयत्न केला किंवा मध्ये आला तर प्रत्येकाला शिक्षा होईल, जीव घेतला जाईल. त्यामुळे भीतीपोटी सर्व गावकरी एकत्र गाव सोडून निघून गेले, असं मानलं जातं.

advertisement

गावकऱ्यांनीच या ठिकाणी शाप दिला की हे गाव पुन्हा कधीच उभं राहणार नाही. याठिकाणी इतर कोणीही राहू शकणार नाही आणि तेव्हापासून आजतागायत हे गाव ओसाड पडलं आहे, इथं कोणीही राहत नाही. त्यामुळे याला शापित गाव म्हटलं जातं. या गावात कोणीही राहत नाही, पण एक 85 वर्षांचा वृद्ध या गावाचं रक्षण करतो.

advertisement

Weird Place Video - भारतातलं असं गाव जे आहे ढगात; इथं पोहोचण्यासाठी तुम्हाला...

या गावाला आजही झपाटलेलं गाव म्हटलं जातं, परंतु राजस्थान सरकारने याला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे, त्यामुळे देश-विदेशातील हजारो पर्यटक दररोज इथं येत असतात.सकाळच्या वेळी हे पर्यटकांनी फुलून गेलेलं असलं तरी संध्याकाळी ते निर्मनुष्य होते.

मराठी बातम्या/Viral/
भारतातील 'शापित' गाव! इथं रातोरात 'गायब' झाले सर्व लोक; आजही कुणीच राहत नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल