नवीन नवरी आली की तिला पाहण्यासाठी महिलांची अक्षरश: गर्दी असते. अशाच गर्दीने वेढलेली ही नववधू. सगळ्या महिलांच्या मधे बसलेली. तिच्या डोक्यावर घुंघट आहे. आता अशी घुंघट घेतलेली नवरी एरवी तुम्हाला शांत दिसेल, लाजताना दिसेल. पण ही नवरी मात्र हातात गिटार घेऊन बसली आहे.
कष्टाचे पैसे नको! फक्त 1 रुपयात वाजगाजत नवरीला घरी घेऊन गेला नवरदेव, हुंड्याचे 31 लाख रुपये नाकारले
advertisement
ती गिटार वाजवायला सुरुवात करते. त्यानंतर ती गाणं गाऊ लागते. तेरा मेरा प्यार अमर असे गाण्याचे बोल. घुंघट घेतलेली ही पारंपारिक वधू आणि तिच्या हातात गिटार अशी तिची मॉडर्न स्टाईल. तिला पाहून ही काय गिटार वाजवणार असं कित्येकांना वाटलं असेल. पण जसं ती गिटार वाजवायला सुरुवात करते तसे सगळे थक्क होतात. त्यानंतर तर लोक आणखी आश्चर्यचकीत होतात जेव्हा ती गाणं गायला सुरुवात करते. तिचा आवाज इतका गोड आहे की डोळे बंद करून ऐकले तर एखादी गायिकाच गाणं गात असावी असं वाटेल.
बॉलिवूडची गायिका, जिच्या गाण्यामुळे वाचले तब्बल 3000 जीव, कसे काय आणि ही आहे कोण?
तेरा मेरा प्यार अमन हे गाणं ही नवरी गाताना दिसते. तिच्या आजूबाजूच्या महिलाही तिच्याकडे टकामका पाहतच राहतात.
इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. बहुतेकांनी महिलेच्या टॅलेंटचं कौतुक केलं आहे. एका युझरने तर रॉकस्टार सून अशी कमेंट केली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
