@bhakttrilokika या ट्विटर अकाउंटवर अनेकदा निरनिराळे व्हिडिओ पोस्ट केले जातात. अलीकडेच या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो बाहुबली बाळाचा आहे. होय, हे बाळ बाहुबलीपेक्षा कमी नाही कारण जन्मताच त्याने असा पराक्रम केला, की नर्सही थक्क झाल्या. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे- चांद्रयान चंद्रावर पोहोचताच भारतात जन्माला आलेला “रिअल बाहुबली”.
advertisement
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका नर्सने नवजात बाळाच्या दोन्ही पायांना धरलं आहे. पण यानंतर मुलाने दोन्ही हातांनी खाली असलेला ट्रे पकडला आणि उचलला. हा तोच ट्रे आहे, ज्यात त्याला जन्मानंतर ठेवलं होतं. नवजात बालकांमध्ये जन्माला येताच एखादी गोष्ट घट्ट धरून ठेवण्याची ताकद नसते. मात्र या बाळाने आपल्या कारनाम्याने सर्वांनाच चकित केलं आहे. ज्या नर्सने बाळाला पकडलं आहे ती देखील हे पाहून हैराण झाली.
wolf man : या देशात आढळला ‘वुल्फ मॅन?’ सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल
या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने विचारलं, की हा व्हिडिओ खरा आहे का? एकाने म्हटलं की, ज्या डॉक्टरने हे कृत्य केलं आहे, त्याला शोधून अटक करा कारण हे अमानवी आहे. महिलेला तुरुंगात पाठवा, असं एकाने म्हटलं. आणखी एकाने म्हटलं की, बाळासोबत असं काही करणं पूर्णपणे चुकीचं आहे. एकाने विनोद करत म्हटलं, की तो खलीचा नातू असेल! इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.