आज अशाच एका गावाबाबत आपण जाणून घेणार आहोत, जिथे मागील 60 वर्षांपासून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत आहे. या गावात कोणताही प्रकारचा वाद होत नाही. लोक याठिकाणी मिळून मिसळून नेतृत्त्व करतात. त्यांनी निवडलेला नेता गावातील विकासात योगदान देईल, याच आशेने गावातील लोक सरपंचाची निवड करतात.
60 वर्षांपासून एकमताने निवडणूक
अमृतसर जिल्ह्यातील बोहरवाला गावात मागील 60 वर्षांपासून लोकांच्या बिनविरोध ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. यावेळीही गावातील लोकांनी मोठे पाऊल उचलत मनप्रीत सिंग “मन्नू माळी” यांची सरपंचपदी बिनविरोध निवड केली आहे. यानिमित्ताने त्यांनी गावातील गुरुद्वारा साहिबला भेट देऊन वाहेगुरुंचे आभार मानले.
advertisement
नोव्हेंबर महिना ठरणार एकच नंबर, मोठा आर्थिक फायदा होणार, नोकरीही मिळणार
निवडीनंतर सरपंच काय म्हणाले -
गावाचे नवीन सरपंच मनप्रीत सिंह यांना आशीर्वाद देताना गावकऱ्यांनी ते गावाच्या विकासासाठी योगदान देतील आणि गावाला सुंदर बनवतील अशी आशा गावकऱ्यांनी व्यक्त केली. तर गावकऱ्यांच्या एकजुटीने मी सरपंच बनलो आहे. मी त्यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले. तसेच गावाला त्यांनी याप्रसंगी महत्त्वाचे आश्वासनही दिले.
आपण गावाच्या विकासासाठी मिळून मिसळून काम करू. तसेच तरुण हे व्यवनापासून दूर राहतील आणि आरोग्यदायी राहतील यासाठी त्यांनी तरुणांसाठी जिम बनवण्याचे वचन नवनियुक्त सरंपच मनप्रीत सिंह यांनी दिले. अशाप्रकारे या गावाने पुन्हा एकदा बिनविरोध निवडणूक करत एकतेचे प्रदर्शन केले.