नोव्हेंबर महिना ठरणार एकच नंबर, मोठा आर्थिक फायदा होणार, नोकरीही मिळणार
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
MONTHLY HOROSCOPE - नोव्हेंबरचा महिना सुरू झाला आहे. हा महिना काही लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. तर काही लोकांना काळजी घेण्याचीही गरज आहे. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी हा महिना कसा राहील, याबाबत जाणून घेऊयात. उज्जैन येथील आचार्य आनंद भारद्वाज यांनी याबाबत माहिती दिली.
शुभम मरमट, प्रतिनिधी
उज्जैन - नोव्हेंबरचा महिना सुरू झाला आहे. हा महिना काही लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. तर काही लोकांना काळजी घेण्याचीही गरज आहे. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी हा महिना कसा राहील, याबाबत जाणून घेऊयात. उज्जैन येथील आचार्य आनंद भारद्वाज यांनी याबाबत माहिती दिली.
मेष – ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना फायदेशीर राहणार आहे. या राशीच्या लोकांना अपेक्षित यश देईल. तुमची अनेक प्रलंबित कामे या महिन्यात पूर्ण होऊ शकतात. सरकारी क्षेत्रातूनही लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
वृषभ – या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये उतार चढाव येतील. उत्पन्नात वाढ होईल. प्रेमसंबंधांमध्ये तणाव आणि वाद होतील. आरोग्याची काळजी घ्यावी.
मिथुन – या राशीच्या लोकांना हा महिना शुभ आणि सौभाग्यशाली राहील. लांब यात्रेवर जाऊ शकता. व्यापारात प्रगती होईल. परदेश यात्रा यशस्वी होईल. कौटुंबिक जीवनात उतार चढाव येऊ शकतात.
कर्क – या राशीच्या लोकांसाठी हा महिना साधारण राहील. करिअरमध्ये प्रगदी होईल. वैवाहिक जीवन आनंददायी राहील.
advertisement
सिंह – ज्योतिष शास्त्रानुसार, या राशीच्या लोकांसाठी हा महिना सुरुवातीला थोडा मंद आणि कमी फळ देणारा असेल. पण शेवटी आर्थिक परिस्थिती चांगली राहील. नोकरीत पदोन्नती होईल. गुंतवणूक करण्यापासून वाचा.
कन्या – या राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमसंबंधात प्रगती येईल. कार्यक्षेत्रात यश मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. व्यवसायात चांगला लाभ होईल.
advertisement
तूळ – या राशीच्या लोकांना चांगले फळ मिळेल. महिनाभर आर्थिक स्थिती चांगली राहील. बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – सुरुवातीला उतार चढाव येऊ शकतात. व्यापारात चांगले अनुभव येतील. मज्जा मस्ती करू शकाल. उत्पन्नात वाढ होईल.
धनु – ज्योतिष शास्त्रानुसार, या राशीच्या लोकांसाठी हा महिना अतिशय शुभ आणि लाभदायक असणार आहे. छोट्या प्रवासाचे योग येतील. हा महिना तुम्हाला लाभ देईल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. तब्येत सुधारेल.
advertisement
मकर – या राशीच्या लोकांना हा महिना मध्यम फलदायी राहील. आपल्यातील कमतरता ओळखून त्याला दूर करण्याच प्रयत्न कराल. आर्थिक दृष्टीनेही हा महिला लाभदायी ठरेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.
कुंभ – या महिन्यात नशिबाची पूर्ण साथ मिळल. प्रवास सुखदायी आणि फायदेशीर राहील. प्रेमसंबंधातील मधुरतेमुळे खर्च कराल. धनलाभाचाही योग आहे.
मीन – ज्योतिष शास्त्रानुसार, हा महिना साधारण राहील. आरोग्यामुळे मानसिक तणाव राहील. जीवन ऊर्जेत कमी अनुभवाल. परदेश यात्रेचा योग राहील. वैवाहिक समस्या येऊ शकतात. करिअरसाठी हा महिना योग्य राहणार आहे.
advertisement
सूचना - या बातमीत दिलेली माहिती ही राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी, आचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. तसेच याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
view commentsLocation :
Ujjain,Madhya Pradesh
First Published :
November 06, 2024 6:32 PM IST


