कोण आहे बबलू बंदर?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा माकड ना जंगलात उड्या मारतो, ना कोणताही सर्कसचा खेळ करतो. बबलू बंदर हा एक सामान्य माकड नसून, AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) द्वारे तयार केलेले पात्र आहे. AI च्या जगात उदयास आलेला हा एक 'ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर' आहे, जो भारतभर प्रवास करतो आणि आपल्या शुद्ध देसी शैलीत ब्लॉग तयार करून लोकांना भारताची सफर घडवतो. त्याच्या बोलण्याची लकब तर विचारूच नका; तो जे काही बोलतो ते ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटेल.
advertisement
बबलू बंदरची देशी बोली अफलातून
बबलूचे वैशिष्ट्य म्हणजे तो हिंदी आणि स्थानिक बोलीभाषेत देशी स्टाईलमध्ये बोलतो. तो भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रवास करतो आणि आपल्या विनोदी कमेंटरीने लोकांची मने जिंकतो. दिल्लीच्या रस्त्यांवर चाट खाणे असो, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर आराम करणे असो किंवा हरिद्वारमध्ये गंगेत डुबकी मारणे असो, बबलू आपल्या विनोदी रील्ससह प्रत्येक ठिकाणी हजर असतो. त्याच्या व्हिडिओंमध्ये बबलू कधी मंदिरांना भेट देताना दिसतो, तर कधी रेल्वे प्रवासाच्या मजेदार कथा सांगताना दिसतो. 10 कोटी व्ह्यूज आणि 80 लाख लाईक्सचा आकडा हे दाखवतो की, बबलू फक्त एक आभासी माकड नाही, तर एक सोशल मीडिया सेन्सेशन आहे.
हे ही वाचा : फुलं, रोमान्स आणि परंपरा: लग्नाच्या पहिल्या रात्री अंथरूण फुलांनी का सजवतात?
हे ही वाचा : Shocking : बंद खोलीत होत्या 2 तरुणी, आतून येऊ लागले विचित्र आवाज, वडिलांनी हळूच दरवाजा उघडताच हादरले
