सध्या 'आईस्क्रीम रोल मॅगी' चा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून आईस्क्रीम लव्हरही हा प्रकार खायला घाबरतील. मॅगी आणि आईस्क्रीमचं हे फ्युजन सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवत आहे.
टाईमपास किंवा इन्स्टंट काही तरी खाताना लोक मॅगी बनवतात. मात्र मॅगीची आईस्क्रीमही कोणी बनवू शकतो असा विचारानेही अनेकांनी किळस येईल. मात्र एका विक्रेत्यानं हा प्रयोग केला असून त्यानं 'आईस्क्रीम रोल मॅगी' मार्केट विकतानाचा त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
advertisement
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती आधी तयार मॅगी पॅनवर ठेवते आणि त्यावर वितळलेले आइस्क्रीम टाकते. यानंतर तो दोन्ही चांगलं मिसळतो. जेव्हा हे दोन्ही पूर्णपणे एकत्र होतात, तेव्हा आइस्क्रीम रोलच्या आकारात कापून, प्लेटवर सजवलं जातं. विक्रेता त्यावर चॉकलेट ओततो आणि लोकांना सर्व्ह करतो.
foodb_unk नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काहीच वेळात व्हिडीओनं इंटरनेटवर खळबळ उडवली. व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून अनेकांनी व्हिडीओला शेअरही केलं आहे.