हा प्रसंग मंडी जिल्ह्यातील चौहार घाटीतील सुधार पंचायत परिसरातील आहे. टिककर गावातील स्टाफ नर्स कमला देवी शुक्रवारी सकाळी हुरंग नारायण देवता गावात लसीकरणासाठी निघाल्या होत्या. मात्र, याच मार्गावर शिल्हबुधानी पंचायत परिसरात काही दिवसांपूर्वी ढगफुटीमुळे आलेल्या पुरात सर्व पादचारी पूल वाहून गेले होते. त्यामुळे स्थानिकांना रस्ता पार करणे कठीण झाले होते.
advertisement
तरीही कमला देवी यांनी आपल्या जबाबदारीला प्राधान्य देत प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नाल्यावरून उडी घेतली आणि रस्ता पार केला. त्या क्षणी त्यांचा पाय घसरला असता तर त्या पाण्याच्या एवढ्या मोठ्या प्रवासात नक्कीच वाहून गेल्या असत्या, पण त्यांनी धैर्य दाखवत नाला पार केला आणि गावात पोहोचून लसीकरणाची जबाबदारी पार पाडली.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोक त्यांच्या जिद्दीला आणि सेवाभावाला सलाम करत आहेत. अनेकांनी तर हा प्रसंग पाहून ऋतिक रोशनच्या ‘क्रिश’ चित्रपटातील एक सीन आठवल्याचं म्हटलं आहे. कमला देवींनाही काहींनी क्रिश म्हटलं आहे. कारण ते खरंच एका सुपर हिरोप्रमाणे आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडत होते.
