लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आता असे तंत्रज्ञान उदयास आले आहे की ज्या कामांसाठी लोकांना पूर्वी बराच वेळ द्यावा लागत होता, ती कामं आता काही मिनिटांत करता येतील. परंतु प्रत्येकाला माहित आहे की तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी तसंच वाईट हेतूंसाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. यापैकी एक डीपफेक आहे.
advertisement
5 पांडवांची बायको, पण द्रौपदीवर सगळ्यात जास्त प्रेम कोण करायचं?
जोधपूरमध्ये आतापर्यंत अनेक तरुणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने ब्लॅकमेल केल्याची प्रकरणं समोर आली आहेत. अनेक सेलेब्स डीप फेकचे बळी ठरले आहेत, तर सर्वसामान्यांसाठीही ही समस्या बनली आहे. त्यांच्या फोटोच्या मदतीने अश्लील व्हिडिओ बनवून लोकांना ब्लॅकमेल केलं जात आहे. आतापर्यंत जोधपूर पोलिसांकडे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत.
जोधपूरमधील एका खासगी महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीला एक तरुण अनेक दिवसांपासून त्रास देत होता. तरुणीला त्याच्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नसून तरुण सतत तिचा पाठलाग करत होता. मुलीने त्याला ब्लॉक केल्यावर त्या मुलाने डीप फेकच्या मदतीने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि व्हायरल केला. असाच प्रकार आणखी एका महिलेसोबत घडला, जिथं लग्न झाल्यानंतर तिच्या Ex ने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तिचा अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केला.
अशा घटना टाळायच्या असतील तर खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचा सोशल मीडिया अत्यंत सुरक्षित ठेवा. सोशल मीडिया खाती लॉक करून ठेवा. तुमच्यासोबत डीप फेकची कोणतीही घटना घडल्यास तात्काळ सायबर सेलला कळवा. सायबर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सहा महिन्यांत त्यांनी अशी तीसहून अधिक ॲप्स शोधून काढली आहेत जी अशी फोटो तयार करतात. गुगलनेही त्यांच्यावर बंदी घातली आहे.