Mahabharat : 5 पांडवांची बायको, पण द्रौपदीवर सगळ्यात जास्त प्रेम कोण करायचं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
स्वयंवरात अर्जुनने द्रौपदीला जिंकलं, पण नंतर परिस्थिती अशी बनली की तिला पाच पांडवांची पत्नी व्हावं लागले. द्रौपदी अर्जुनवर प्रेम करत होती. पण पाच पांडवांपैकी तिच्यावर कोणाचं मनापासून प्रेम होतं हे तुम्हाला माहीत आहे का?
नवी दिल्ली : महाभारतात द्रौपदी आणि पांडव यांच्यातील संबंधांचे वर्णन अतिशय तपशीलवारपणे केलं आहे. स्वयंवरानंतर जेव्हा द्रौपदी पाच पांडवांसह घरी आली तेव्हा तिला वाटलं की ती फक्त अर्जुनची पत्नी होईल, परंतु कुंतीने असं काही सांगितलं की तिला पाचही भावांची पत्नी व्हावं लागलं. यामुळे तिला सुरुवातीला खूप वाईट वाटलं पण नंतर तिनं या भूमिकेशी जुळवून घेतलं. पाच भावांमध्ये द्रौपदी नेहमीच कोणावर तरी सर्वात जास्त प्रेम करत असे, तो अर्जुन होता. पाचही पांडवांनी द्रौपदीवर प्रेम केलं आणि तिचा आदर केला, परंतु एक पांडव होता ज्याने तिच्यावर इतकं प्रेम केले की तो तिच्यासाठी सर्वकाही करायला तयार होता.
पाचही पांडवांपैकी एक असा पांडव होता, जो द्रौपदीची प्रत्येक इच्छा नेहमी पूर्ण करायचा. जेव्हा वेळ आली तेव्हा त्याने द्रौपदीसाठी एकदा नव्हे तर अनेक वेळा अशा गोष्टी केल्या, ज्या कोणत्याही पांडवाने केल्या नाहीत.
द्रौपदीच्या अपमानाचा घेतला बदला
जेव्हा जेव्हा द्रौपदीचा अपमान व्हायचा किंवा तिला दुःख व्हायचं, ते हा पांडव तिच्या मदतीसाठी सदैव तत्पर असायचा. जेव्हा फाशाचा खेळ खेळून द्रौपदीचं चिरहरण झालं तेव्हा त्याने दुर्योधन आणि दुशासन यांना उघडपणे त्यांच्या मृत्यूची शपथ घेतली.
advertisement
द्रौपदीसाठी प्रतिज्ञा करून ती पूर्ण केली. द्रौपदीच्या चिरहरणाचा बदला घेतला. महाभारताच्या युद्धात दुशासनाचा वध करून त्याच्या रक्ताने आपलं वचन निभावलं. . द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने दुर्योधनाची मांडी तोडली. युद्धादरम्यान त्याने दुर्योधनासह अनेक कौरवांचा वध केला वनवासात त्याने द्रौपदीला सतत आश्वासन दिलं की तो सर्व कौरवांना त्यांच्या कृत्याची शिक्षा नक्कीच देईल. त्याने हे देखील केलं.
advertisement
वनवासात दिली साथ
सर्वात कठीण गोष्टी केल्या वनवासात जेव्हा किचकने द्रौपदीचा अपमान केला तेव्हा त्याने न डगमगता त्याचा वध केला. द्रौपदीची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न त्याने केला. दुर्मिळ फुलं मिळवण्यासाठी त्याने कुबेरच्या जंगलात (गंधमादन पर्वत) खडतर प्रवास केला. या प्रवासात त्याने यक्ष आणि राक्षसांचा वध केला आणि फुले आणून द्रौपदीची इच्छा पूर्ण केली. वनवासात तिचं वारंवार सांत्वन केलं.
advertisement
त्याचं प्रेम आणि भक्ती निःस्वार्थ होती, त्याने तिच्यावर अत्यंत निष्ठेने आणि निःस्वार्थपणे प्रेम केलं. ज्यामुळे तो द्रौपदीचा सर्वात जवळचा आणि विश्वासू पांडव बनला. त्याचं प्रेम त्याच्या कृतीतूनच नव्हे तर त्याच्या बोलण्यातून आणि भावनांमध्येही दिसून आलं. त्याच्यासोबत द्रौपदी स्वतःला सर्वात सुरक्षित समजत होती. द्रौपदीच्या प्रत्येक सुख-दुःखाची काळजी घेतली. द्रौपदीच्या सन्मानासाठी आणि आनंदासाठी आपली सर्वस्व अर्पण केलं. हा पांडव कोण होता याचा अंदाज लावता येईल का?
advertisement
अर्जुनचं द्रौपदीवरील प्रेम
पाच पांडवांपैकी द्रौपदीला अर्जुनबद्दल नक्कीच सर्वात जास्त प्रेम आणि आपुलकी होती. पण हा एक पांडव जे करायला तयार होता ते अर्जुनने कधीच केलं नाही. याउलट अर्जुनने इतर स्त्रियांशी अनेकवेळा प्रेम केलं आणि लग्न केलं. पांडवांमध्ये त्याला सर्वाधिक पत्नी होत्या. अर्जुनच्या या स्वभावामुळे द्रौपदीने अनेकवेळा त्याच्यावर राग व्यक्त केला. अर्जुनचे द्रौपदीवरील प्रेम अधिक संवेदनशील आणि नियंत्रित होतं. त्याने द्रौपदीबद्दल आदर राखला, परंतु इतर गोष्टीदेखील त्याच्या जीवनात महत्त्वाच्या होत्या.
advertisement
युधिष्ठिरचं द्रौपदीवरील प्रेम
युधिष्ठिरने भावनिक अंतर राखलं. युधिष्ठिराचे द्रौपदीवरील प्रेम कर्तव्य आणि धर्मावर आधारित होतं. त्याचं तिच्यावर मर्यादित प्रेम होतं पण त्याच्या प्रेमावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. कारण त्यानेच तिला पणाला लावलं होतं. युधिष्ठिराने नेहमी द्रौपदीचा आदर केला, परंतु त्याचे प्रेम अधिक औपचारिक आणि नियंत्रित होतं. त्यानं द्रौपदीशी भावनिक अंतर राखलं. भीम किंवा अर्जुनाप्रमाणे द्रौपदीला भावनिक आधार देण्यात युधिष्ठिराने सक्रिय भूमिका बजावली नाही.
advertisement
नकुल, सहदेवचं द्रौपदीवरील प्रेम
नकुल आणि सहदेव यांनी द्रौपदीला आदर आणि आपुलकी दिली, परंतु त्यांचं प्रेम बंधुभाव किंवा मैत्रीसारखं होतं. त्यांनी द्रौपदीच्या इच्छेचं पालन केलं. ते मदत करायला तयार होते. पण त्यांचं प्रेम भीमासारखे अजिबात नव्हतं. द्रौपदीचे त्याच्याबद्दलचे प्रेम आणि आपुलकी ही मातृत्वाची भावना होती.
आता मग या पाच पांडवात उरला तो भीम. ज्याचं द्रौपदीवर सगळ्यात जास्त प्रेम होतं. वर जे काही सांगितलं ते सारंकाही भीमाने द्रौपदीसाठी केलं.
Location :
Delhi
First Published :
January 25, 2025 3:23 PM IST