advertisement

अचानक पैशांची गरज पडलीये? पर्सनल लोन घ्यावं की क्रेडिट कार्ड, पाहा काय बेस्ट

Last Updated:

अचानक मोठा खर्च आल्यास पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड ईएमआय बाहेरुन एकसमान दिसतात. मात्र खऱ्या अर्थाने दोन्हीची खर्च आणि जोखिम ही वेगवेगळी असते. पर्सनल लोन सामान्यतः कमी व्याज आणि जास्त स्थिर ईएमआय देते. तर क्रेडिट कार्ड ईएमआय महाग पडू शकते आणि कार्ड लिमिटला ब्लॉक करते. नो कॉस्ट ईएमआय अनेकदा फक्त डिस्काउंटच्या जागी लपलेलं व्याज असतं. योग्य निर्णय व्याजदर, फीस आणि क्रेडिट स्कोअरवर पडणारा परिणाम पाहून करणे आवश्यक आहे.

पर्सनल लोन vs क्रेडिट कार्ड
पर्सनल लोन vs क्रेडिट कार्ड
नवी दिल्ली : आपल्यापैकी सर्वांनाच कधीकधी अचानक खर्च येतो. कधी मेडिकल एमर्जेसी येते, तर कधी एखादी वस्तू घेणं हे खुप गरजेचं असतं. अशावेळी आपल्या डोक्यात दोन ऑप्शन सर्वात आधी येतात. एक म्हणजे बँकेतून पर्सनल लोन घ्यावं किंवा मग क्रेडिट कार्डने ईएमआय भरावे. बाहेरुन दोन्हीही सोपे, फिक्स्ड टेन्योर आणि फिक्स्ड ईएमआय सारखे दिसतत. मात्र खरी कहाणी नंतर सुरु होते. व्याज दर, प्रोसेसिंग फीस आणि मिस्ड पेमेंटचा परिणाम. यावरुनच समजते की, कोणता ऑप्शन खरंच स्वस्त आणि कोणता फक्त दिसतोच स्वस्त.
आज पर्सनल लोनचे व्याज दर एका मोठ्या रेंजमध्ये मिळतात. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि इन्कम स्टेबल असेल तर टीन्समध्ये व्याज मिळू शकते. कमकुवत प्रोफाइलवर हेच दर तेजीने वर जातता. तर क्रेडिट कार्ड ईएमआय केल्यावर महाग होते.
बँका अनेकदा नो-कॉस्ट EMIचा दावा करतात, परंतु कार्ड ईएमआयवर वार्षिक आधारावर 18 ते 24 टक्के किंवा त्याहूनही जास्त व्याजदर असू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, समान रक्कम आणि मुदतीसाठी पर्सनल लोन क्रेडिट कार्ड EMIपेक्षा अनेकदा स्वस्त असते, जोपर्यंत तुमच्याकडे खूप खास कार्ड ऑफर नसेल.
advertisement
नो कॉस्ट ईएमआय 
नो कॉस्ट ईएमआय ऐकण्यासाठी खुपच सोपं वाटतं. पण खरंतर यात एक ट्रिक असते. अनेकदा मर्चेंट व्याजाच्या बरोबर डिस्काउंट सोडतात. यामुळे ईएमआय नो कॉस्ट दिसते.
तुम्ही खरंच सेव्हिंग करत नसता तर तुम्हाला डिस्काउंट मिळत नसते. या व्यतिरिक्त क्रेडिट कार्ड ईएमआयवर प्रोसेसिंग फीस आणि त्यावर जीएसटीही लागतो. हा पैसा तुमच्या प्रिंसिपल कमी करत नाही, तर तुमचा एकूण खर्च वाढवतो. पर्सनल लोनमध्येही प्रोसेसिंग फीस असते. मात्र ही सामान्यतः पहिलेच स्पष्ट सांगितली जाते आणि तुलना करणे सोपे जाते.
advertisement
मंथली फ्लेक्सिबिलिटीवर परिणाम 
पर्सनल लोनचा ईएमआय फिक्स्ड आणि प्रेडिक्टेबल असतो आणि तुमच्या रोजच्या खर्चापेक्षा वेगळा राहतो. यामुळे तुमचा क्रेडिट कार्ड इमर्जेंसीसाठी फ्री राहतो.
क्रेडिट कार्ड EMI तुमच्या कार्डची लिमिट ब्लॉक करतात. यामुळे तुमच्या उपलब्ध क्रेडिटची रक्कम कमी होते आणि वापर वाढू शकतो, ज्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरला नुकसान होऊ शकते. तुम्ही कार्ड ईएमआय चुकवला तर दंड जास्त असतो, व्याज अचानक वाढते आणि संपूर्ण कार्ड बॅलन्सवर महाग व्याज जमा होऊ शकते. पर्सनल लोन अधिक स्ट्रक्चर्ड असतात आणि थोडी अधिक माफक मानली जातात.
view comments
मराठी बातम्या/मनी/
अचानक पैशांची गरज पडलीये? पर्सनल लोन घ्यावं की क्रेडिट कार्ड, पाहा काय बेस्ट
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement