advertisement

Teeth Personality: दात बाहेर असणाऱ्या लोकांमध्ये एक बाब सारखीच; 'अशा' गोष्टी स्मार्टपणे करण्यात पटाईत

Last Updated:

Teeth Personality: सामुद्रिक शास्त्रानुसार दात बाहेर असणाऱ्या लोकांमध्ये काही खास गोष्टी असतात. ज्योतिषी आचार्य इंदू प्रकाश यांनी दात बाहेर असणाऱ्या लोकांच्या स्वभावाचे वर्णन केले आहे. त्यांच्या मते, असे लोक इतरांना पटवून देण्यात पारंगत असतात आणि...

News18
News18
मुंबई : मुखवटा, एखाद्याच्या दिसण्याला अनेकजण भाळतात. दिसण्यामध्ये दातांची रचना कशी आहे, यालाही महत्त्व दिलं जातं. सामुद्रिक शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांवरून ठरवता येतो. दात मोठे किंवा दात बाहेर असणारे लोक आपल्या अवती भोवती दिसतात. सामुद्रिक शास्त्रानुसार दात बाहेर असणाऱ्या लोकांमध्ये काही खास गोष्टी असतात. ज्योतिषी आचार्य इंदू प्रकाश यांनी दात बाहेर असणाऱ्या लोकांच्या स्वभावाचे वर्णन केले आहे. त्यांच्या मते, असे लोक इतरांना पटवून देण्यात पारंगत असतात आणि स्वभावाने दयाळू असतात. अशा लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि स्वभावाबद्दल येथे जरा अधिक समजून घेऊ.
ज्यांचे दात सामान्यपेक्षा थोडे लांब असतात आणि ओठांच्या बाहेर डोकावतात, अशी माणसं खूपच बोलकी असतात. त्यांना कितीही वेळ बोलायला सांगा, ती कधीच कंटाळत नाहीत. समोरच्याला आपल्या बोलण्यात कसं अडकवायचं आणि आपलं म्हणणं कसं पटवून द्यायचं, यात ही मंडळी एकदम माहीर असतात.
त्यांचा स्वभाव कधी एकदम हसमुख असतो, तर कधी अचानक रागीट होतो. ही माणसं मनानं खूप साधी आणि दयाळू असतात, त्यामुळे सगळीकडे त्यांना मान मिळतो. पण काय होतं, बाहेर इतका आदर मिळूनही त्यांच्या स्वतःच्या घरातल्या माणसांशी मात्र त्यांचं सारखं किरकोळ कारणावरून खटकतं.
advertisement
बाहेर दात असणाऱ्या लोकांकडे जगाची आणि समाजाची समज चांगली असते. ती लोकांशी पटकन मैत्री करतात आणि कोणत्या वेळी कसं बोलायचं, हे त्यांना पक्कं ठाऊक असतं. पण त्यांचा हा कधी खेळकर तर कधी रागीट स्वभाव जवळच्या नातेवाईकांसाठी थोडा त्रासाचा ठरू शकतो. अशा लोकांनी थोडा शांत राहून घराकडे लक्ष दिलं, तर त्यांचं आयुष्य अजून सुखाचं होईल. समाजात मात्र त्यांच्या आत्मविश्वासाची आणि रुबाबाची कायम चर्चा असते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याविषयी आम्ही दावा करत नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Teeth Personality: दात बाहेर असणाऱ्या लोकांमध्ये एक बाब सारखीच; 'अशा' गोष्टी स्मार्टपणे करण्यात पटाईत
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement