Dombivli : डोंबिवलीपासून प्रवास आता सुसाट होणार; स्थानकातील मोठा अडथळा दूर, काय आहे रेल्वेचा प्लॅन?
Last Updated:
Dombivli Station Update News : मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकातील एक मोठी समस्या दूर होणार आहे, यामुळे रेल्वेचा वेगही वाढणार आहे आणि अजून कोणता फायदा होणार आहे त्याबाबत सविस्तर अपडेट जाणून घ्या.
डोंबिवली : मध्य रेल्वेवरील डोंबिवली एक मुख्य गर्दीचे स्थानक आहे. विशेषता याच स्टेशनच्या पुढेच स्थानक हे कल्याण असल्याने हा मुख्य मार्ग देखील आहे. मात्र आता डोंबिवली सह कल्याणच्या प्रवाशांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे.
नेमका काय होणार बदल?
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 पूर्ण क्षमतेने वापरता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचे काम हाती घेतले आहे. सध्या सीएसएमटी आणि कल्याण दिशेला असलेल्या वळणांमुळे फलाट क्रमांक 1 वर येणाऱ्या लोकल गाड्यांना वेग कमी करावा लागतो. त्यामुळे गाड्यांना एक ते दीड मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागतो आणि उशिर होतो.
advertisement
ही अडचण टाळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून कल्याण दिशेकडील बहुतांश लोकल गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक '1ए' वरून सोडल्या जात होत्या. त्यामुळे प्रवाशांना नेहमी धावपळ करावी लागत होती. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, आसनगाव आणि कर्जत दिशेकडील धीम्या गाड्या प्रामुख्याने 1 ए वरूनच सुटत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती.
डोंबिवली स्थानकाचा कायापालट सुरू
आता फलाट क्रमांक 1 चे कोपर बाजूकडील विस्तारीकरण सुरू असून या कामासाठी वाहनतळ आणि उपकर्षण केंद्राजवळील जागा संपादित करण्यात आली आहे. तसेच मार्गावरील दोन्ही वळणे काढण्याचे कामही सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर गाड्या सहज आणि वेगाने ये-जा करू शकतील.
advertisement
लोकल फेऱ्यांत होणार मोठी वाढ
रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार विस्तारीकरण पूर्ण झाल्यावर डोंबिवली स्थानकावर लोकल गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनीही प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 12:07 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli : डोंबिवलीपासून प्रवास आता सुसाट होणार; स्थानकातील मोठा अडथळा दूर, काय आहे रेल्वेचा प्लॅन?









