ॲमेझॉनच्या वर्षावनात लपलेल्या अगणित जमाती असोत, त्या आपल्यासाठी न सुटलेले कोडे आहेत. अशीच एक अत्यंत रहस्यमय जमात म्हणजे इंडोनेशियाच्या पापुआ प्रांतातील घनदाट जंगलात राहणारी कोरोवाई जमात. हे लोक झाडांवर आपली घरे बांधतात. नरभक्षण ही देखील त्यांची एक अनोखी परंपरा मानली जाते. त्यांची जीवनशैली, अनोख्या परंपरा आणि बाहेरील जगाशी कोणताही संपर्क नसणे त्यांना खऱ्या अर्थाने असाधारण बनवते.
advertisement
जगाला कधी माहित झाली ही जमात
कोरोवाई जमातीबद्दल बाहेरील जगाला पहिली माहिती 1974 मध्ये मिळाली, जेव्हा एका डच धर्मोपदेशकाने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे धाडस केले. यापूर्वी या प्राचीन समुदायाबद्दल कोणालाही माहिती नव्हती. हा संपर्क एक ऐतिहासिक क्षण ठरला, ज्यामुळे या जमातीची ओळख जगासमोर आली.
सुरुवातीच्या शोधानंतर संशोधक, पत्रकार आणि काही पर्यटकांनी या भागाला भेट देण्यास सुरुवात केली. मात्र, या भागात बाहेरच्या लोकांची वाढती संख्या काही नकारात्मक परिणाम घेऊन आली आणि 90 च्या दशकात या भागात वेश्याव्यवसायाची समस्याही वाढू लागली. इंडोनेशिया सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या सक्रिय प्रयत्नांमुळे 1999 पर्यंत अशा अनैतिक कृत्ये पूर्णपणे थांबवण्यात आली.
झाडाच्या 40 फूट उंचीवर बांधतात घरे
बाहेरील जगाशी संपर्क वाढला असला तरी, कोरोवाई जमातीतील बहुतेक लोक अजूनही एकांतात जीवन जगतात. हे लोक जमिनीपासून 6 ते 12 मीटर (सुमारे 20 ते 40 फूट) उंचीवर झाडांवर बांधलेल्या घरात राहतात, जी त्यांच्या संरक्षणासाठी एक अनोखी रणनीती आहे.
ही उंच घरे केवळ त्यांना बाह्य हल्ल्यांपासूनच नव्हे, तर स्थानिक मान्यतेनुसार दुष्ट आत्म्यांपासून (खाखुआ) देखील वाचवतात. ही घरे मजबूत झाडांवर किंवा खांबांवर स्थानिक संसाधनांचा वापर करून बांधली जातात. आपल्या उपजीविकेसाठी हे लोक प्रामुख्याने शिकारीवर अवलंबून असतात आणि त्यांचा नेम अचूक असतो. ते रानडुक्कर आणि कुसकुस यांसारख्या प्राण्यांची शिकार करतात आणि साबूदाण्याच्या झाडाला आपले मुख्य अन्न मानतात.
माणसाचं मांस हे त्यांचे पारंपरिक अन्न
ज्या भागात कोरोवाई जमात राहते, तो भाग अरफुरा समुद्रापासून सुमारे 150 किलोमीटर दूर आहे. या लोकांवर अनेक आंतरराष्ट्रीय माहितीपटही बनले आहेत, ज्यात त्यांच्या रहस्यमय जीवनशैली आणि कथित नरभक्षक प्रथेचा उल्लेख आहे. असे म्हटले जाते की हे लोक अंधश्रद्धेवर खूप विश्वास ठेवतात. त्यांच्या श्रद्धा प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग ‘खाखुआ’ ही संकल्पना आहे.
कोरोवाई लोकांचा असा विश्वास आहे की जर एखाद्या व्यक्तीचा रहस्यमय आजाराने मृत्यू झाला, तर त्याचे कारण ‘खाखुआ’ म्हणजे एक दुष्ट जादूगार आहे, जो मृत व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्याला आतून खातो. त्यांचा असा विश्वास आहे की या खाखुआला न्याय मिळवून देण्यासाठी मृतदेहाचे मांस खाल्ले पाहिजे. हे नरभक्षण बदला आणि त्यांच्या न्याय प्रणालीचा भाग मानले जाते. मात्र, आधुनिक संशोधकांचा असा विश्वास आहे की, बाहेरील जगाशी वाढलेल्या संपर्कामुळे ही प्रथा आता बरीच कमी झाली आहे. तरीही, त्यांच्या या भयानक विश्वासामुळे ते जगातील सर्वात रहस्यमय जमातींपैकी एक बनले आहेत.
हे ही वाचा : रम ते व्हिस्की, बिअर ते वाईन! दारू नेमकी तयार कशी होते? कोणते घटक वापरले जातात?
हे ही वाचा : किंग कोब्रा जगतो किती वर्षे? 'या' ठिकाणी असेल तर 15 वर्षांनी वाढतं या विषारी सापाचं आयुष्य!
