तुम्हाला विश्वास बसणार नाही, अतिशय बिझी असलेल्या शहरात अगदी रस्त्याच्या कडेलाच हे घर आहे. ज्याच्या आजूबाजूचं दृश्यही मनमोहक आहे. इथं सीसीटीव्हीच्या माध्यमातून 24 तास पाळत ठेवली जाते. तसंच गेट किपर आहे. तुम्हाला पार्किंग मिळणार नाही. पण बाहेर जागा आहे, जिथं तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता.
advertisement
या घराचा लिलाव 19 डिसेंबरला होणार होता मात्र आता तो जानेवारी अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. एसडीएल प्रॉपर्टीजने सांगितलं की, आम्ही लिलाव सुरू करातच अर्जदारांची रांग लागली होती. आतापर्यंत अनेक अर्ज आले आहेत.
या घराचा लिलाव करणारी कंपनी एसडीएल प्रॉपर्टीजने सांगितलं की, या भागातील अशा फ्लॅटचे मासिक भाडं 38 हजार रुपये आहे. त्याच शेजारच्या एका बेडरूमच्या फ्लॅटची किंमत 139,000 पाऊंड म्हणजेच अंदाजे 1.5 कोटी रुपये आहे. या फ्लॅटची किंमतही तेवढीच आहे आणि भविष्यात आणखी नफा मिळेल, असा दावा रिअल इस्टेट एजंट्सने केला आहे.
घर इतक्या कमी किमतीत का विकलं जात आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या घराचा मालक हाँगकाँगचा रहिवासी आहे, ज्याला त्याची ही प्रॉपर्टी विकून तिथून निघून जायचं आहे. त्यामुळे तो कोणत्याही प्रकारे थ्रोवे किमतीत ते विकायला तयार आहे. दुसरं म्हणजे हे स्टुडिओ अपार्टमेंट आहे. तुम्हाला किचन कुणाशीतरी शेअर करावं लागेल. बिल्डिंगमधील सर्व मजल्यांवर एकच कॉमन किचन आहे. तळघरात एक कम्युनिटी रूम आणि लॉन्ड्री रूमदेखील आहे.
आता हे घर आहे कुठे तर यूकेच्या लिव्हरपूलमध्ये. लिव्हरपूल शहराच्या केंद्रापासून तुम्ही इथं फक्त 6 मिनिटांत पोहोचू शकता, असं डेली मेलच्या वृत्तात म्हटलं आहे. (सर्व फोटो - SDL Auction/डेली मेल)