पण बहुतेक भारतीय स्वयंपाकघरात कांदा हा आवशक मानला जातो. कांद्या शिवाय भारतीय जेवणाला चव नाही. त्यामुळे कांदा हा सगळ्या भाज्यांमध्ये वापरला जातोच. पण तुम्हाला माहितीय का की भारतात असं एक शहर आहे जिथे कांदा खाणं तर सोडाच तिथे कांद्याचा नामोनिशाण नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की त्या भागात कांद्यावर बंदी आहे.
advertisement
कांदा-लसूणवर बंदी का?
कटरा हे माता वैष्णोदेवीच्या यात्रेचं मुख्य प्रवेशद्वार आहे. या पवित्र स्थानाची शुद्धता राखण्यासाठी इथं कांदा-लसूण वापरणं टाळलं जातं. हिंदू धर्मानुसार कांदा आणि लसूण यांना ‘तामसिक आहार’ मानलं जातं. असा आहार मन-शरीरात आलस्य, क्रोध आणि विकार वाढवतो, असं सांगितलं जातं. त्यामुळे पूजाअर्चा आणि व्रताच्या काळात यांचं सेवन वर्ज्य आहे. कटरा सात्विक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे आणि इथं आजही ही परंपरा कठोरपणे पाळली जाते.
कटरामध्ये कांद्याचं उत्पादन, विक्री किंवा वापर काहीच होत नाही. स्थानिक भाज्या मंडई, किराणा दुकाने किंवा हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये कुठंही कांदा-लसूण मिळणार नाही. अगदी प्रवासी हॉटेल्समध्येसुद्धा कांदा-लसूण टाकलेली डिश मिळत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की इथलं जेवण चवहीन असतं. उलट, इथले सात्विक पदार्थ कांदा-लसूणशिवायसुद्धा पौष्टिक आणि चवदार असतात, ज्यांचा आस्वाद भाविक आनंदाने घेतात.
या परंपरेला स्थानिक नागरिक आणि प्रशासन दोघेही जबाबदारीनं पाळतात. बाहेरून आलेले प्रवासी कांद्याबद्दल विचारपूस करतात पण दुकानदार त्यांना सात्विक पर्याय सुचवतात. स्थानिकांच्या मते ही फक्त परंपरा नसून आस्थेचा भाग आहे. कटरानं दाखवून दिलंय की, श्रद्धा आणि शिस्त मिळाली तर परंपरा ही नियम बनते.