या नद्या बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात मिळतात. पण भारतात एक अशी नदी आहे जी समुद्राला न मिळताच नाहीशी होते. नद्यांचे पाणी सहसा गोड असतं. अनेक समुद्री जीव त्यात राहतात. त्याच्या पाण्याने लोक आपली तहान भागवतात. पण समुद्राचं पाणी पिण्यायोग्य नसतं. हे पाणी खारट असतं. पण भारतात एक अशी नदीही आहे, जिचं पाणी कोणीही पिऊ शकत नाही. याचं कारण म्हणजे त्याचा खारटपणा. होय, भारतातील एकमेव नदी जिचं पाणी खारट आहे.
advertisement
सर्पदंशानंतर सापाचं विषच कसं वाचवतं माणसाचा जीव? असं बनतं अँटीव्हेनम इंजेक्शन
तसंच, ही नदी विशेष आहे कारण याचं पाणी कोणत्याही समुद्रात जाऊन मिसळत नाही. ही अशी नेमकी कोणती नदी आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, ही लूनी नदी आहे. लूनी नदी खोल नाही. ती रुंद वाहते. नदी रुंद झाल्यावर तिचं पाणी लवकर वाफेत बदलतं.
तसंच, लूनी नदी राजस्थानच्या त्या भागातून जाते जिथे उष्णता तीव्र असते. अशा स्थितीत तिथलं पाणी लवकर वाफेत बदलतं आणि ते नाहीसं होतं. थारच्या वाळवंटात गेल्यावर, लूनी नदी गुजरातमधील कच्छच्या रणात नाहीशी होते आणि कोणत्याही समुद्राला जाऊन मिळत नाही.