सर्पदंशानंतर सापाचं विषच कसं वाचवतं माणसाचा जीव? असं बनतं अँटीव्हेनम इंजेक्शन
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
सर्वात प्रथम सापांचं विष गोळा करण्याचा एक विशेष मार्ग आहे. प्रत्येकजण सापाचं विष काढू शकत नाही. कारण त्याचा एक थेंब देखील कोणाचाही जीव घेऊ शकतो.
नवी दिल्ली 18 नोव्हेंबर : जगभरात दरवर्षी 2 लाखांहून अधिक लोकांचा साप चावल्याने मृत्यू होतो. भारतातही हजारो लोकांचा यामुळे मृत्यू होतो. आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये साप चावल्यामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. हा मृत्यू टाळण्यासाठी अँटीव्हेनम इंजेक्शन तयार करण्यात आले आहेत. अनेकवेळा तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल, की हे औषध सापाच्या विषापासून कसं बनतं? हे विष कोणत्या जीवातून तयार होतं? आज आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.
केवळ विषानेच विष मारलं जातं, असं तुम्ही वडिलधाऱ्यांकडून अनेकदा ऐकलं असेल. अँटीव्हेनम इंजेक्शन बनवण्याच्या बाबतीत ही गोष्ट अगदी तंतोतंत बसते. ते बनवताना वापरण्यात येणारी प्रक्रिया जाणून घेतल्यावर तुम्हाला ते नीट समजेल. सर्वात प्रथम सापांचं विष गोळा करण्याचा एक विशेष मार्ग आहे. प्रत्येकजण सापाचं विष काढू शकत नाही. कारण त्याचा एक थेंब देखील कोणाचाही जीव घेऊ शकतो. एवढंच नाही तर ते खूप मौल्यवान आहे.
advertisement
भारतात अँटीव्हेनम बनवण्याची पद्धत आणखी खास आहे. इथे सर्वाधिक सर्पदंश होणाऱ्या चार सापांचे विष काढले जाते. यात कोब्रा, घोणस, क्रेट आणि रसल वाइपर यांचा समावेश आहे. या सापांचं विष काढलं जातं. यानंतर, विषाचे काही थेंब विशिष्ट प्रकारचे घोडे किंवा मेंढ्यांमध्ये टाकले जातात. त्यांना विष दिल्याबरोबर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वेगळ्या प्रकारची अँटीबॉडी तयार करू लागते. विष हळूहळू नष्ट होतं आणि हे अँटीबॉडी सीरमच्या स्वरूपात काढलं जातं. ते काढण्याची प्रक्रियाही बरीच तांत्रिक आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अँटीस्नेक सिरमची किंमत 600 रुपयांपर्यंत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2023 8:30 AM IST